ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

श्री क्षेत्र सोनारीच्या श्री काळभैरवनाथाच्या यात्रेची जय्यत तयारी. यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी जि.प. सदस्य धनंजय सावंत तर उपाध्यक्षपदी युवराज पाटील. Grand preparations are underway for the fair of Shri Kalbhairavnath at the holy site of Sonari.

श्री क्षेत्र सोनारीच्या श्री काळभैरवनाथाच्या यात्रेची जय्यत तयारी. 

यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी जि.प. सदस्य धनंजय सावंत तर उपाध्यक्षपदी युवराज पाटील.

रंगोली न्यूज - परंडा दि. ३)

Grand preparations are underway for the fair of Shri Kalbhairavnath at the holy site of Sonari.
Grand preparations are underway for the fair of Shri Kalbhairavnath at the holy site of Sonari.

Grand preparations are underway for the fair of Shri Kalbhairavnath at the holy site of Sonari. महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथ "
Shri Kalbhairavanath" यात्रेच्या नियोजनासाठी दि २ एप्रिल २०२६ रोजी नियोजन बैठक संपन्न झाली. ग्रामपंचायत कार्यालय सोनारी येथे झालेल्या बैठकीमध्ये श्री काळभैरवनाथ यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत तर उपाध्यक्षपदी युवराज पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


Grand preparations are underway for the fair of Shri Kalbhairavnath at the holy site of Sonari.
सोनारी येथील श्री काळभैरवनाथ

   माजी सरपंच तथा प्रशासक परमेश्वर मांडवे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. आगामी यात्रा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि भाविकांच्या सोयीनुसार पार पाडण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

      यावेळी माजी सरपंच संभाजी सुरवसे, माजी सरपंच गुरुदास मोरे, माजी ग्रा.पं. सदस्य ईश्वर मोरे, चेअरमन बाबासाहेब पाटील, उद्योजक सचिन पवार, जयराम नलवडे, बंडू हांगे, महादेव सांगडे, आबासाहेब हांगे, पद्माकर तोडकरी, सचिन मोरे, नवनाथ साबळे, अविनाश हांगे, दिगंबर ईटकर, अविनाश नलवडे, दिपक पाटील, सुशील कुंभार, परमेश्वर पवार यांच्यासह यांच्यासह गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

       यात्रेनिमीत्त श्री काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह परराज्यातून भाविक भक्त मोठ्या संखेने येतात. त्यांची व्यवस्था, सोय सुविधा करण्यासाठी प्रशासकीय आणि ग्रामपंचायत पातळीवर जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. 

यात्रा समित्यांची होणार स्थापना :-

Grand preparations are underway for the fair of Shri Kalbhairavnath at the holy site of Sonari.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष धनंजय सावंत
नवनियुक्त अध्यक्ष धनंजय सावंत व उपाध्यक्ष युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या तीन-चार दिवसांत पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार असुन या बैठकीमध्ये यात्रेच्या नियोजनासाठी महत्त्वाच्या असलेल्या जागा वाटप, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या कुस्ती कमिटीसह अन्य विविध समित्यांची घोषणा करण्यात येणार आहे.







Grand preparations are underway for the fair of Shri Kalbhairavnath at the holy site of Sonari.
यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष युवराज पाटील












आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments