अखंड शिवनाम सप्ताह उत्साहात संपन्न; हजारो भाविकांची उपस्थिती. ...
.jpeg)
Akhand Shivanam Week concludes with enthusiasm;
Akhand Shivanam Week concludes with enthusiasm; परंडा रंगोली न्युज - दि.९) राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा शहरातील भोत्रा रोड येथील सदगुरु यज्ञेश्वर शिवाचार्य (वेडे महाराज) यांच्या पुण्यतिथी निमित्त्तआयोजित अखंड शिवनाम सप्ताह, परमरहस्य ग्रंथाचे पारायण, रथोत्सव व संगीतमय शिवपाठ हा धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सप्ताहादरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, पारायण, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
![]() |
| Akhand Shivanam Week concludes with enthusiasm; |
शनिवार दि. ७ मार्च रोजी वेडे महाराज यांच्या २२६ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये रुद्राभिषेक, बिल्वार्पण, सामूहिक ईश्वरलिंग महापूजा, धर्मसभा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
[ ] प्रमुख उपस्थिती -
यावेळी वेदांताचार्य मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज (वेळापूर) सिध्दलिंग शिवाचार्य महाराज (शिंगणापूर) डॉ. निलकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर) शिवानंद शिवाचार्य महाराज (वाळवा) प्रभु देव शिवाचार्य महाराज (माढा) वीरूपाक्ष शिवा चार्य महाराज (मानुर) बार्शीच्या नगराध्यक्षा तेजस्वीनी कथले, परंडा न.प. अध्यक्ष जाकिरभाई सौदागर
![]() |
| Akhand Shivanam Week concludes with enthusiasm; |
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!