ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ग्लोबलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी. Education is the greatest instrument for social transformation! — Ashatai Morajkar शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन! -आशाताई मोरजकर

ग्लोबलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी.

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन! -आशाताई मोरजकर

Education is the greatest instrument for social transformation!
Education is the greatest instrument for social transformation!

रंगोली न्युज - परंडा दि. ११) Education is the greatest instrument for social transformation! धाराशिव जिल्ह्या परंडा तालुक्यातील ग्लोबलमध्ये दि. ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

       कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर तसेच संस्थेच्या सचिव आशाताई मोरजकर यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षकांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. स्त्रीशिक्षण, समाजसुधारणा आणि समानतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना प्रेरणादायी ठरली.

[ ] Education is the greatest instrument of social change! शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन!

महात्मा फुले जयंती निमित्त संस्थेच्या सचिव अशाताई मोरजकर यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे. "Education is the greatest instrument of social change!" त्यांनी पुढे सांगितले की, मुलींना शिक्षण देण्याचे महत्त्व ओळखून फुलेंनी समाजात मोठी क्रांती घडवून आणली. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांसाठी कार्य करावे असे आवाहन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे अभ्यास करण्यास, वाईट सवयींपासून दूर राहण्यास आणि आदर्श नागरिक बनण्यास प्रेरित केले. 

[ ] संदेश -

     संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये असे प्रति पादित केले की, महात्मा फुलेंनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्याय दूर करण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी शिक्षणाला विशेष महत्त्व दिले आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या महान कार्यामुळे आज आपण प्रगत समाजात जगत आहोत. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे. समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा अंगीकार करून आपण समाजाला अधिक सक्षम आणि प्रगत बनवू शकतो. विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रामाणिकपणा व सातत्य ठेवून परिश्रम करावेत. अशा प्रकारे आपण सर्वांनी एकत्रितपणे समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे. सर्वांनी मिळून महात्मा फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. 

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाडुळे आर.एस, प्रास्ताविक मोरे एस.ए तर आभार प्रदर्शन लोंढे पी.एल. यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments