परंडा पोलीस स्टेशन येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.
सामाजिक जबाबदारी व परस्पर सहकार्य या मूल्यांचा स्वीकार समाज परिवर्तन शक्य आहे! - पो.नि. आसाराम चोरमले
माणूस आपल्या गुण, कर्तृत्व व नैतिकतेवरून श्रेष्ठ ठरतो! - डॉ. आनंद मोरे
रंगोली न्युज - परंडा दि. ११)

Mahatma Jyotiba Phule Jayanti celebrated at Paranda Police Station.
Mahatma Jyotiba Phule Jayanti celebrated at Paranda Police Station. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त परंडा पोलीस स्टेशन येथे उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व लोकाभिमुख वातावरणात दि. ११ रोजी जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
समाजप्रबोधन, शिक्षण व सामाजिक न्याय या मूल्यांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमासाठी डॉ. आनंद मोरे (आयुष वैद्यकीय अधिकारी) "AYUSH Medical Officer" यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी परंडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांच्या व डॉ. आनंद मोरे यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी ए.पी.आय. संतोष सुर्वे, नितीन राजे गुंडाळे, विश्वनाथ शिंदे, तसेच सचिन लेकुरवाळे, भाऊसाहेब ताड, गजानन मुळे, जगदाळे यांच्यासह पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
[ ] Social transformation is possible through the adoption of the values of social responsibility and mutual cooperation. सामाजिक जबाबदारी व परस्पर सहकार्य या मूल्यांचा स्वीकार समाज परिवर्तन शक्य आहे! - पो.नि. आसाराम चोरमले
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक चोरमोले यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा संदर्भ देत सांगितले की, समाजातील ज्वलंत समस्या जसे की, शिक्षणातील असमानता, सामाजिक भेदभाव, अंधश्रद्धा, महिला व बालकांवरील अन्याय किंवा कायद्याबाबतची अज्ञानता या सर्व समस्या भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून, शांततामय व कायदेशीर मार्गाने सोडवता येतात. नागरिकांनी कायद्याचा आदर, सामाजिक जबाबदारी व परस्पर सहकार्य या मूल्यांचा स्वीकार केल्यास समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे शक्य आहे, 'It is possible to bring about positive changes in society.' असे नमूद केले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य व न्याय यांचे अधिकार दिले असून, त्याचबरोबर कायद्याचे पालन करणे, सामाजिक ऐक्य राखणे व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. महात्मा फुले यांच्या विचारांमध्येही हाच संदेश आढळतो की, शिक्षण व जागरूकता यांच्या बळावर समाजातील अन्याय व विषमता दूर करता येते.
[ ] A person is judged to be superior based on their virtues, achievements, and morality. माणूस आपल्या गुण, कर्तृत्व व नैतिकतेवरून श्रेष्ठ ठरतो! - डॉ. आनंद मोरे
यावेळी डॉ. आनंद मोरे यांनी सत्यशोधक समाज स्थापनेचा संदर्भ देत सांगितले की, धर्म, जात किंवा सामाजिक स्थिती यावरून माणसाचे मूल्य ठरत नाही; माणूस आपल्या गुण, कर्तृत्व व नैतिकतेवरून श्रेष्ठ ठरतो. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षण, विज्ञाननिष्ठ विचारसरणी व कायद्याचा सन्मान यांचा स्वीकार करून समाजातील समस्या जबाबदारीने व शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की, स्त्री-पुरुष समानता, महिला शिक्षण व सामाजिक न्याय या बाबींची सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून झाली. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही समाजसेवा करत शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला आणि समाजाला आत्मसन्मान, स्वाभिमान व कर्तव्यनिष्ठा यांचा संदेश दिला.
[ ] नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्याचा संकल्प.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी महात्मा फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून समाजातील समस्या सोडवण्याचा व नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्याचा संकल्प व्यक्त केला. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत कायद्याचे ज्ञान, शिक्षण व सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधल्यास समाजातील अनेक समस्या सहजपणे सोडवता येतात, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
[ ] संदेश -
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दिलेला “शिक्षण, समानता, कायद्याचा आदर व सामाजिक जबाबदारी” हा संदेश उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला असून, समाजातील प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून शांतता, न्याय व बंधुता जपत समाजनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, हीच खरी महात्मा फुले यांना आदरांजली ठरेल, असा भावनिक व प्रेरणादायी संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!