ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering. स्नेहसंमेलनामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहण.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

स्नेहसंमेलनामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहण.

Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering.
Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering.

रंगोली न्युज दि. १०) Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कात्राबाद येथे दि. ७ एप्रिल रोजी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले असून या निमीत्ताने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहण मिळाले. 

Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering.
Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering.

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती शिवश्री भाऊसाहेब खरसडे, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी अण्णासाहेब जाधव, परंडा नायब तहसीलदार श्रीमती पूजा गोरे, धाराशिव मुख्यालय पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते, परंडा विस्तार अधिकारी महादेव विटकर साहेब, खासगाव चे सरपंच मिलिंद लिमकर, ग्रामसेवक अशोक शिंदे, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे, भूम तालुका संघाचे कार्याध्यक्ष दत्ता गुंजाळ सर, साने गुरुजी पतसंस्थेचे मा.चेअरमन जयदेव गंभीरे, सचिव दैवान पाटील,

Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering.
Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परमेश्वर बोराडे उपाध्यक्ष इम्रान पटेल, उपसरपंच गणेश कोकाटे पोलीस पाटील महादेव मोरे,मिटू लोकरे, परसराम कोळी, अमोल गरड, शिवाजी काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

     शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कापसे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तसेच वर्षभर शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्यावर सादरीकरण केले. यामध्ये महाराष्ट्राची लोककला लावणी, कोळीगीत, देशभक्तीपर गीत, शेतकरीगीत, विनोदी गीत, बालगीत यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत विविध गीतावर आपले कलेचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाव देण्यात आला.

Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering.
Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering.

   या कार्यक्रमासाठी गावातील महिला, पुरुष,पालक, विद्यार्थी तसेच तालुक्यातील शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग, शिक्षक बंधू भगिनी यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी कात्राबाद ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. सदरील कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी दाद देत तब्बल ३९ हजार रुपये देणगी स्वरूपात बक्षीस देण्यात आले. यावेळी सर्व बक्षिसदात्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering.
Encouragement for the artistic talents of rural students at the social gathering.

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, पालकवर्ग, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, आणि ग्रामपंचायत कार्यालय यांचेही सहकार्य मिळाले. कार्यक्रमावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर जार चे पाणी मोफत पुरवठा करणारे श्रीराम एक्वा देवगाव चे श्री सुधीर काटे यांचा शाळेच्या वतीने नायब तहसीलदार श्रीमती पूजा गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र कापसे, शिक्षक दीपक मिरकले, मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी श्रीमती तब्बसुम पटेल, श्रीमती सुलभा गरड, कोरिओग्राफर मयूर बोंबलट, गोपीनाथ बोराडे, देविदास बोराडे, फोटोग्राफर शुभम शिनगारे,अमर सय्यद, हर्षद फासे, बालाजी दौंड, विद्यार्थी, पालक, आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले.

    सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रविंद्र कापसे सर यांनी केले. सूत्रसंचालन विनोद सुरवसे, बाळासाहेब हजारे आणि यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक मिरकले यांनी केले.

आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments