सोनारी येथील श्री काळभैरवनाथ यात्रेनिमीत्त यात्रा कमिटी व प्रशासन सज्ज.
लोकप्रतिनिधी व यात्रा कमिटीची दुसरी आढावा बैठक संपन्न.
रंगोली न्युज - परंडा दि. ९)

The Fair Committee and the administration are fully prepared for the Shri Kalbhairavnath Fair at Sonari.
The Fair Committee and the administration are fully prepared for the Shri Kalbhairavnath Fair at Sonari. महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथाची यात्रा १३ ते १६ एप्रिल या दरम्यान साजरी होत असून दि. १५ एप्रिल रोजी मुख्य रथोत्सव होणार आहे. या यात्रेनिमित्त यात्रा कमिटी, भैरवनाथ ट्रस्ट, भैरवनाथ गुरूगादी, ग्रामपंचायत व प्रशासनाकडून भाविकांसाठी विविध सुविधा व नियोजनाबाबत आढावा घेण्याविषयी ग्रामपंचायत कार्यालय सोनारी येथ दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुसरी आढावा बैठक घेण्यात आली.
![]() |
| The Fair Committee and the administration are fully prepared for the Shri Kalbhairavnath Fair at Sonari. |
श्री काळभैवनाथ यात्रा कमिटी "Shri Kalbhaivanath Yatra Committee" अध्यक्ष तथा जि. प. सदस्य धनंजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कृषी व पाशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, तहसीलदार निलेश काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमोले, गटविकास अधिकारी विनोद जाधव, पो.नि. आसराम चोरमोले, अंभी पोलीस ठाणे स.पो.नि. गोरक्ष खरड, तालुका आरोग्य अधिकारी डी.एस. निंभोरकर, महावितरण चे उपकार्यकारी अभियंता सुनील पवार, बांधकाम विभाग अभियंता बोराडे, जि.प.बांधकाम विभागाचे उपअभियंता पाईकराव, सरपंच परमेश्वर मांडवे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष युवराज पाटील, मठाधीपाती पीर योगी शामनाथ महाराज, भैरवनाथ मंदिरातील पुजारी समीर पुजारी, ग्रामसेवक एच. एम. चौधरी, मंडळ अधिकारी, तलाठी, यांच्यासह पाणीपुरवठा, आरोग्य विभाग, आगार व्यवस्थापक व विविध विभागांचे अधिकारी, यात्रा कमिटी व विविध समिती सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The Fair Committee and the administration are fully prepared for the Shri Kalbhairavnath Fair at Sonari.
👉 भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी यात्रा कमिटी व प्रशासनाची तयारी.

भाविक भक्तांचे कुलदैवत श्री काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी 'For the Darshan of Shri Kalbhairavnath—the family deity of devout devotees.' प्रतीवर्षीपेक्षा या वर्षी अधिक भाविक येण्याची शक्यता बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आली. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा पुरविणे या अनुषंगाने मंदिर परिसर व गावातील इतर ठिकाणी पिण्याच्या व अंघोळीच्या पाण्याची सोय करणे, भाविकांना भैरवनाथाचे सुलभ दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेटिंग लावणे, मंदिर परिसरात मोक्याच्या ठिकाणी सी-फायर सिलिंडर व अग्निशमन गाडी तसेच पोलिस बॉदोबस्त, यात्रेदरम्यान सुरळीत वीजपुरवठा, जागोजागी सूचना फलक, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रथ मार्गाची डागडुजी, जादा बसगाड्या, आरोग्य सुविधा, बंदोबस्तावरील शासकीय कर्मचाऱ्यांना भोजनाची व्यवस्था आदींबाबत यावेळी अंतिम चर्चा करण्यात आली. येत्या तीन दिवसात सर्व कामे मार्गी लावण्यासंदर्भात सक्त आदेश यात्रा कमिटी अध्यक्ष धनंजय सावंत, तहसीलदार निलेश काकडे व सभापती भाऊसाहेब खरसडे यांनी दिले.

The Fair Committee and the administration are fully prepared for the Shri Kalbhairavnath Fair at Sonari.
👉 श्री काळभैरवनाथाचा रथोत्सव.

श्री काळभैरवनाथाची दि. ९ ते १६ एप्रिल रोजी श्री काळभैरवनाथाचा यात्रा असून दि. ९ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता देवाचा लग्न सोहळा, दि. १३ एप्रिल रोजी एकादशी दिवशी यात्रेला सुरुवात, दि. १४ एप्रिल रोजी द्वादशीनिमित्त देवाला नेवैद्य व अभिषक, दि. १५ एप्रिल रोजी मुख्य यात्रा असून दुपारी २ वाजता रथोत्सव कार्येक्रम होणार आहे. तर दि. १६ एप्रिल रोजी जंगी कुस्त्यांचा फड दुपारी २ वाजता रंगणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!
.jpeg)
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!