Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जि.प. जवळा (नि.) गटातुन धनंजय सावंत यांचा लक्षवेधी विजय. ...... धनंजय सावंत यांच्या कार्यकर्त्यांचा विजयी आनंदोत्सव जल्लोषात. .....

विजयानंतर धनंजय सावंत यांना खांद्यावर घेऊन जल्लोष

जि.प. जवळा (नि.) गटातुन धनंजय सावंत यांचा लक्षवेधी विजय. ......

धनंजय सावंत यांच्या कार्यकर्त्यांचा विजयी आनंदोत्सव जल्लोषात. .....

परंडा - प्रतिनिधी दि. ९) जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या फडात शिवसेना (शिंदे) पक्षातुन बंड करून जिल्हा परिषदेचे मा. सभापती धनंजय सावंत यांनी परंडा तालुक्यातील जवळा (नि.) गटातुन भाजप पुरस्कृत अपक्ष निवडणुक लढविली आणी धडाकेबाज विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोश केला. 

        तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जवळा (नि.) गटामध्ये आ. तानाजी सावंत यांचे पुतने धनंजय सावंत यांनी शिवसेना (शिंदे) पक्षातुन बंडखोरी करून भाजपा पुरस्कृत अपक्ष म्हणुन निवडणुकीच्या रिंगणामध्ये विरोधकांसमोर दंड थोपटले होते. आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या सोबतिने निवडणुक प्रचाराचा धुरळा उडवुन दिला होता. एकीकडे आपल्या कार्यकर्ते व मतदारांच्या विश्वासावर विजयाची खात्री बाळगुण असलेले धनंजय सावंत यांना मतदारांनी विजय मिळवुन दिला. मतदारांच्या सेवेसाठी निवडणुकीच्या फडात उतरलेले धनंजय सावंत यांना मतदारांनी तब्बल १ हजार ९२१ मतांनी विजय मिळवुन दिला. तो विजय कळताच कार्यकर्त्यांना आपल्या सेवेत उतरले नेते धनंजय सावंत यांचे सहकारी कार्यकर्ते यांनी सावंत यांना खांद्यावर घेऊन विजयाचा आनंदोत्सव जोरात साजरा केला.

कार्यकर्ते, सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना धनंजय सावंत

        जि.प. जवळा (नि.) गटामधुन धनंजय सावंत यांनी बाजी मारली असून जवळा (नि.) गटातून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जि.प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत (६५१७) यांनी शिवसेना (शिंदे) गटाचे रमेश कारकर (४५९६) यांचा १९२१ मतांनी पराभव केला आहे.






आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी.... 

रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com

-: शहाजी कोकाटे :-

मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments