आ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात पंचाय समिती वर शिवसेना (शिंदे) पक्षाची एकहाती सत्ता. .....
पंचायत समितीच्या १० पैकी ६ जागेवर शिवसेना (शिंदे) ये उमेदवार विजची. ......
जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या धनंजय सावंत यांचे बंड यशस्वी. .....
धनंजय सावंत यांचा १ हजार ९२१ मतानी धडाकेबाज विजय. ...
परंडा - दि. ९) तालुक्यातील जिल्हा परिषद च्या ५ गटामध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाच्या २, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १, भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार १ तर शिवसेना (उ.बा.ठा.) पुरस्कृत अपक्ष १ असे उमेदवार निवडून आले. तर पंचायत समितिच्या १० गणा पैकी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या ६ जागेवर विजय झाल्याने परंडा पंचायत समितीवर माजी मंत्री आ.प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे) पक्षाची एकहाती सत्ता आली आहे. तर पं.स गणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस २, भाजपा १ तर शिवसेना (उ.बा.ठा.) च्या १ असे उमेदवार विजयी झाले आहेत.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जवळा (नि.) गटामध्ये आ. तानाजी सावंत यांचे पुतने धनंजय सावंत यांनी बंडखोरी करून भाजपा पुरस्कृत अपक्ष म्हणुन निवडणुकीच्या रिंगणामध्ये दंड थोपटले होते. त्यामध्ये धनंजय सावंत यांनी बाजी मारली असून जवळा (नि.) गटातून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जि.प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत (६५१७) यांनी शिवसेना (शिंदे) गटाचे रमेश कारकर (४५९६) यांचा १९२१ मतांनी पराभव केला आहे.
तर माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांनी परंडा पं.स वर १० पैकी ६ उमेदवारांनी विजयी सलामी देऊन वर्चस्व निर्माण करून शिवसेना (शिंदे) पक्षाचे शेळगाव गटातून गटाचे ॲड. सुभाष मोरे यांचे चिरंजीव अमर मोरे (मिळालेली मते ५१९६) यांनी भाजपचे शरद पवार (४०१८) यांचा ११७८ मतांनी पराभव केला. तर आनाळा गटातून युवासेना प्रमुख राहूल डोके यांच्या मातोश्री वैशाली डोके (६७१८) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री पाटील (४५३२) यांचा २१८६ मतांनी पराभव केला आहे. तसेच परंडा पंचायत समितीच्या ६ जागेवर विजय मिळविला त्यामध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार चिंचपूर (बु.) गणातून बापुराव भिल्लारे (२८३८) यांनी भाजपाचे एकनाथ वायसे (२००४) यांचा ८३४ मतांनी पराभव केला. शेळगाव गणातून शिवसेना (शिंदे) गटाच्या रेश्मा गायकवाड (४५३२) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या अश्वीनी भांडवलकर (२६९७) यांचा १८३५ मतांनी दारूण पराभव केला. आनाळा गणातून शिवसेना (शिंदे) गटाच्या मालन कोलते (३०९२) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल भोजने (२००४) यांचा १०८८ मतांनी पराभव केला. जवळा गणातून शिवसेना शिंदे गटाचे परसू गवारे (२५९२) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत कातूरे (२१५४) यांचा १३८ मतांनी पराभव केला. सोनारी गणातून शिवसेना (शिंदे) गटाचे समाधान नलवडे (२२७८) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी पाटील (२१८८) यांचा ९० मतांनी पराभव केला. तर वडणेर गणातून शिवसेना शिंदे गटाच्या अर्चना आण्णासाहेब जाधव (२७६२) यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष शैला वेताळ (२५७०) यांचा १९२ मतांनी पराभव केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जि.प. च्या १ जागेवर व पं.स च्या २ जागेवर यश मिळाले आहे. यामध्ये डोंजा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणगंगा साखर कारखाना संचालक भाऊसाहेब खरसडे (६२६८) यांनी जि.प. माजी सभापती अविदाबाई जगताप (५४५०) यांचा ८१८ मतांनी पराभव केला. पं.स. च्या खासापूरी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपाली खुळे (२४७८) यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सीमा खैरे (२०३८) यांचा ४४० मतांनी पराभव केला. व डोंजा गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज पाटील (२६४१) यांनी शिवसेना शिंदे गटाचे शशिकांत पाटील (२०६४) यांचा ५७७ मतांनी पराभव केला आहे.
शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाला पंचायत समितीच्या १ जागेवर यश मिळाले आहे त्यामध्ये लोणी गणातून शिवसेना (उ.बा.ठा.) गटाच्या धनश्री लोकरे (३०१९) यांनी शिवसेना (शिंदे) गटाच्या रेखा शिंदे (२५२३) यांचा ४९६ मतांनी पराभव केला. तर लोणी गटातून शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार राणी रेवण ढोरे (७३५८) यांनी शिवसेना शिंदे गटाच्या अनिता राऊत (३९०३) यांचा ३४५५ मतांनी दारूण पराभव केला आहे.
तर भाजपा ला पं.स. च्या सिरसाव गणातून भाजपच्या मोनिका पाटील (२५६३) यांनी शिवसेना (शिंदे) गटाच्या राधिका जाधव (२४९६) यांचा ६७ मतांनी पराभव केला असून जि. प. गटात भाजपा पुरस्कृत अपक्ष धनंजय सावत यांचा विजय झालेला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!