श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे परंडा शहरात भक्तिमय स्वागत; वैष्णवांच्या महापुराने नाथ चौक दुमदुमला
![]() |
| Devotional welcome for the Palkhi of Saint Eknath Maharaj in Paranda city; Nath Chowk reverberated with a massive surge of devotees. |
परंडा, दि. १९ (रंगोली न्युज) – Devotional welcome for the Palkhi of Saint Eknath Maharaj in Paranda city; Nath Chowk reverberated with a massive surge of devotees. पैठण येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान केलेल्या श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे परंडा शहरात आगमन होताच नाथ चौक परिसर वैष्णवांच्या महापुराने आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "एकनाथ महाराज की जय" अशा जयघोषांनी दुमदुमून गेला. भाविकांनी पुष्पवृष्टी करत आणि नाथांच्या पादुकांचे दर्शन घेत भक्तिभावाने पालखीचे जल्लोषात स्वागत केले.
![]() |
| Devotional welcome for the Palkhi of Saint Eknath Maharaj in Paranda city; Nath Chowk reverberated with a massive surge of devotees. |
दि. १८ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता पालखीचे नाथ चौकात आगमन झाले. यावेळी परंडा तहसीलदार निलेश काकडे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, नगराध्यक्ष जाकिर सौदागर, शिवसेना नेते दत्ता (अण्णा) साळुंके, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील, विश्वजीत ज्ञानेश्वर पाटील, मोहन देशमुख, मुकुंद देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारो भाविकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.
परंडा शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते. शहरातील विविध सेवाभावी संस्था, गणेश मंडळे, व्यापारी आणि नागरिकांनी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, पिण्याचे पाणी तसेच भोजनाची व्यवस्था करून वारकरी सेवेचा आदर्श घालून दिला. अनेक ठिकाणी महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले, तर भाविकांनी नाथांच्या पादुकांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे नेतृत्व रघुनाथ नारायणबुवा पालखीवाले करत आहेत. तब्बल ४२८ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका आणि पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
पालखीचे परंडा शहरात आगमन होणार असल्याने पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे पालखीचा मुक्काम मंगळवार पेठ येथील मोहन देशमुख यांच्या निवासस्थानी झाला. या ठिकाणी वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून रात्री भजन-कीर्तनाचा भक्तिमय कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी मुंगशी मार्गे पुढील प्रवासासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
परंडा शहरात संत एकनाथ महाराजांच्या पालखी आगमनाने संपूर्ण वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघाले. वारकरी संप्रदायाची परंपरा, सेवाभाव आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले. पालखी सोहळ्याने परंडा शहरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत आषाढी वारीच्या परंपरेला अधिकच उजाळा दिला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!