संत एकनाथ महाराज पालखी आगमनापूर्वी पालखी मार्गाचा सिमेंट काँक्रीट रस्ता पूर्ण; नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांची तत्परता
![]() |
| Cement concrete road along the Sant Eknath Maharaj Palkhi route completed ahead of the procession's arrival; prompt action by Municipal Council President Zakir Saudagar. |
परंडा, दि. १७ (रंगोली न्युज): Cement concrete road along the Sant Eknath Maharaj Palkhi route completed ahead of the procession's arrival; prompt action by Municipal Council President Zakir Saudagar. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे परंडा शहरात आगमन होण्यापूर्वीच खसापुरी चौक ते जय भवानी गणेश मंडळ चौक या महत्त्वाच्या पालखी मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. परंडा शहराचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी स्वतः कामाची पाहणी करून संबंधित यंत्रणेला वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यामुळे वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग सुरक्षित व सुखकर झाला आहे.
दरवर्षी आषाढी वारीनिमित्त पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी, भगवानगड (आपेगाव) तसेच विविध भागांतून येणाऱ्या वारकरी दिंड्या व पालख्या याच मार्गाने परंडा शहरात प्रवेश करतात. मात्र, खसापुरी चौक ते जय भवानी गणेश मंडळ चौक या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने वारकऱ्यांना चालताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी तातडीने सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला.
काम सुरू झाल्यानंतर नगराध्यक्षांनी स्वतः वारंवार भेट देऊन कामाचा आढावा घेतला. दर्जेदार व वेळेत काम पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या. त्यामुळे पालखी आगमनापूर्वीच रस्ता पूर्ण करण्यात यश आले.
शनिवार, दि. १८ जुलैपासून परंपरेनुसार संत एकनाथ महाराजांची पालखी, भगवानगड (आपेगाव) तसेच इतर भागांतील वारकरी व पालख्या परंडा शहरात दाखल होणार आहेत. हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुखकर व्हावा, यासाठी या रस्त्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, रस्त्यालगतच्या नाल्याचे उर्वरित काम पुढील आठवड्यात पूर्ण करण्यात येणार असून पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. पालखी मार्गावरील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वारकरी, नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून या तातडीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून आषाढी वारीपूर्वी पालखी मार्ग सुस्थितीत केल्याबद्दल नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या पुढाकाराचे स्वागत होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!