समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या 'समता विवेक वारी'चे परंडा शहरात उत्स्फूर्त स्वागत
![]() |
| Spontaneous welcome in Paranda city for the 'Samata Vivek Wari,' which spreads the message of equality, fraternity, and humanity. |
परंडा, दि. १७ (रंगोली न्युज): Spontaneous welcome in Paranda city for the 'Samata Vivek Wari,' which spreads the message of equality, fraternity, and humanity. मातृतीर्थ सिंदखेडराजा ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा प्रवास करत वारकरी संतांनी दिलेल्या समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी निघालेल्या 'समता विवेक वारी'चे शुक्रवारी परंडा शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. शहरात वारीचे आगमन होताच विविध सामाजिक, राजकीय व बौद्ध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी वारीतील मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले.
या वारीमध्ये नांदेडचे माजी साखर आयुक्त श्रीकांत देशमुख, गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील (संगमनेर), संत चोखामेळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन पाटील, डॉ. प्राचार्य दिनानाथ पाटील, कीर्तनकार रत्नमाला पाटील (अमळनेर), आळंदीचे डॉ. विजय महाजन यांच्यासह अनेक साहित्यिक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
परंडा शहरात आगमनानंतर वारीतील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी जयघोष करत समता, सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला.
समता विवेक वारीच्या स्वागतासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज कोळगे, महाराष्ट्र चॅम्पियन वस्ताद संजय काशिद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्रकुमार निकाळजे, माजी नगरसेवक गणेश राशिनकर, सावता परिषदेचे शिवाजी येवारे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस घनश्याम शिंदे, जीवन बनसोडे, बौद्धाचार्य महावीर बनसोडे, राजेंद्र बनसोडे, दत्तात्रय धनवे, अमजद मुजावर, नागसेन चौतमहाल, संदीप बनसोडे, जयंत चौतमहाल, गणेश मदने, तुषार कोळेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वारकरी संतांनी दिलेल्या समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक सलोखा या मूल्यांचा प्रसार करण्याची आजच्या काळात अधिक गरज असल्याचे सांगितले. परंडा शहरातील नागरिकांनीही वारीचे उत्स्फूर्त स्वागत करत सामाजिक ऐक्याचा संदेश अधिक दृढ केला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!