ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्यदायी जीवनशैली व प्रभावी अभ्यास पद्धतीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन Guidance to students on personality development, a healthy lifestyle, and effective study methods.

व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्यदायी जीवनशैली व प्रभावी अभ्यास पद्धतीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Guidance to students on personality development, a healthy lifestyle, and effective study methods.
Guidance to students on personality development, a healthy lifestyle, and effective study methods.

परंडा, दि. १५ (रंगोली न्यूज) – Guidance to students on personality development, a healthy lifestyle, and effective study methods. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक प्रगती आणि योग्य जीवनमूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशाने बावची विद्यालय, परंडा येथे इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्यदायी जीवनशैली आणि प्रभावी अभ्यास पद्धती यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध मुद्द्यांबाबत शंका उपस्थित करून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक बाबासाहेब तोरणे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, चांगल्या सवयी, किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल तसेच मन, मेंदू, मस्तक आणि मनगट यांचा समतोल विकास याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यशस्वी जीवनासाठी सकारात्मक विचार, आत्मविश्वास, शिस्त, वेळेचे महत्त्व आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा मर्यादित वापर करून अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यानंतर विकास वाघमारे यांनी स्टिंगसह विविध एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिली. अशा पेयांमुळे होणारे शारीरिक नुकसान, आरोग्यावरील विपरीत परिणाम आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक केले. आरोग्यदायी आहार आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी दत्तात्रय थोरात यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी अभ्यास पद्धती, वेळेचे नियोजन, नियमित उजळणी, अभ्यासातील सातत्य आणि परीक्षेपूर्वीचा आत्मविश्वास याविषयी मार्गदर्शन केले. योग्य नियोजन आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन सचिन मोरे व धोंडीराम दुधे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडीराम दुधे यांनी केले, तर शुधोधन घोगरे यांनी आभार प्रदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी आयोजित करण्यात आलेला हा समुपदेशन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला. विद्यालयाच्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून कौतुक करण्यात आले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments