श्री संत एकनाथ महाराजांच्या ४२७ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे परंडा तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत.
![]() |
| Spontaneous welcome for the 427th Ashadhi Wari Palkhi procession of Shri Sant Eknath Maharaj in Paranda Taluka. |
परंडा, दि. १७ (रंगोली न्युज): Spontaneous welcome for the 427th Ashadhi Wari Palkhi procession of Shri Sant Eknath Maharaj in Paranda Taluka. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या ४२७ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथे गुरुवारी (दि. १७) भाविकांच्या उत्स्फूर्त स्वागताने आगमन झाले. श्री संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान, पैठण येथून निघालेल्या या पवित्र पायी दिंडी सोहळ्याचे ग्रामस्थांनी भक्तिभावाने स्वागत करत वारकरी परंपरेचा गौरव जपला.
पालखी गावात दाखल होताच "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "एकनाथ महाराज की जय" च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेत फुलांची उधळण करून व दिंडीतील वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत केले. यावेळी वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी पालखी सोहळ्याचे मुख्य नियोजक ह.भ.प. श्री रघुनाथ महाराज आणि ह.भ.प. श्री नारायण महाराज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून संत परंपरेचे जतन व वारकरी संस्कृतीचा प्रसार होत असल्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या स्वागत समारंभास शिवसेना परंडा तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते अमोल नलवडे, अनाळा येथील उपसरपंच कल्याणराव शिंदे यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी आणि खंडेश्वरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत एकनाथ महाराजांच्या विचारांचा समाजात प्रसार व्हावा, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा, असे मत व्यक्त केले. वारकरी संप्रदायाची परंपरा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे संपूर्ण खंडेश्वरवाडी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेऊन संत एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना अर्पण केली.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!