ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

श्री दत्त संस्थानच्या पालखीचे परंडा शहरातील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये स्वागत. The Palkhi of Shri Datta Sansthan was welcomed at Jijamata Primary Vidyamandir School in Paranda city.

श्री दत्त संस्थानच्या पालखीचे परंडा शहरातील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये स्वागत.

The Palkhi of Shri Datta Sansthan was welcomed at Jijamata Primary Vidyamandir School in Paranda city.
The Palkhi of Shri Datta Sansthan was welcomed at Jijamata Primary Vidyamandir School in Paranda city.

परंडा दि. १८ (रंगोली न्युज) – The Palkhi of Shri Datta Sansthan was welcomed at Jijamata Primary Vidyamandir School in Paranda city. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या बीड जिल्ह्यातील बावी येथील श्री दत्त संस्थानच्या पालखीचे परंडा शहरातील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर येथे "At Jijamata Primary Vidyamandir" अत्यंत भक्तिमय वातावरणात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालखी आगमनाने परिसरात वारकरी संप्रदायाच्या जयघोषाने आणि भक्तिरसाने भरलेले वातावरण निर्माण झाले.

यावेळी राजे छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती दत्ता (आण्णा) साळुंके, मातोश्री कमलबाई साळुंके, उद्योजक तुकाराम (काका) साळुंके, अंकित साळुंके, समर्थ साळुंके, माजी नगरसेवक गणेश राशनकर, बापूसाहेब मिस्कीन, जिजामाता प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सत्यजित घाडगे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी पालखीचे पुष्पहार अर्पण करून व वारकऱ्यांचे स्वागत केले.

स्वागतानंतर वारकरी भाविकांनी पारंपरिक पद्धतीने गोल रिंगण करून टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड गजर करत भजन-कीर्तन सादर केले. विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून उपस्थित नागरिकांनीही या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.

पालखी सोहळ्यानिमित्त जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर येथे वारकऱ्यांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. वारकरी तसेच शिक्षक सोसायटीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आयोजकांनी केलेल्या नियोजनाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.

या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होण्यासाठी परंडा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भक्तिभाव, सेवाभाव आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा हा सोहळा परंडा शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला साजेसा ठरला.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments