ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सामाजीक सलोख्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे परंडा शहरात भक्तिमय स्वागत. The Palkhi of Shri Sant Dnyaneshwar Maharaj received a devotional welcome in Paranda city amidst an atmosphere of social harmony.

सामाजीक सलोख्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे परंडा शहरात भक्तिमय स्वागत.

The Palkhi of Shri Sant Dnyaneshwar Maharaj received a devotional welcome in Paranda city amidst an atmosphere of social harmony.
The Palkhi of Shri Sant Dnyaneshwar Maharaj received a devotional welcome in Paranda city amidst an atmosphere of social harmony.

परंडा दि. २१ (रंगोली न्युज) – The Palkhi of Shri Sant Dnyaneshwar Maharaj received a devotional welcome in Paranda city amidst an atmosphere of social harmony. सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे प्रतीक ठरलेल्या एका प्रेरणादायी सोहळ्यात सर्व हिंदु-मुस्लिम बांधवांनी संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव येथून निघालेल्या पवित्र पालखीचे परंडा शहरात उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. परंडा शहरातील विविध धर्मीय नागरिकांनी एकत्र येत संत परंपरेप्रती श्रद्धा व्यक्त केली आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.

पालखीचे आगमन होताच उपस्थितांनी फुलांची उधळण करून, हार अर्पण करून व जयघोषाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. या प्रसंगी परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. सर्व धर्मीय नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभाव आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ केली.

यावेळी जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील, युवा नेते विश्वजीत (आबा) पाटील, युवा नेते समरजित सुजितसिंह ठाकूर यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच ज्येष्ठ नेते शब्बीर (मामू) पठाण, जनार्धन मेहेर, शहरप्रमुख रईस मुजावर, नगरपरिषदेचे गटनेते अनिल शिंदे, नगरपरिषद पाणीपुरवठा समितीचे सभापती रमेशसिंह परदेशी, राहुल बनसोडे, नगरसेवक इस्माईल कुरेशी, अब्बास मुजावर, मजहर दहेलूज, सत्तार पठाण, आकिब पठाण, सोमनाथ अलबत्ते, मधुकर गायकवाड, संतोष मेहेर, लतीफभाई कुरेशी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समता, मानवता आणि बंधुभावाच्या विचारांचे स्मरण करून समाजात शांतता, सौहार्द आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. विविध धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन केलेले हे स्वागत परंडा शहराच्या सामाजिक एकात्मतेचे आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले.

संतांच्या विचारांचा वारसा जपत परस्पर सन्मान, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा स्वागत सोहळा नागरिकांच्या मनात कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments