ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

श्री संत भगवान बाबा यांच्या पालखीचे कल्याणसागर विद्यालयात भक्तिमय वातावरणात स्वागत Shri Sant Bhagwan Baba's Palkhi welcomed at Kalyansagar Vidyalaya amidst a devotional atmosphere.

श्री संत भगवान बाबा यांच्या पालखीचे कल्याणसागर विद्यालयात भक्तिमय वातावरणात स्वागत

Shri Sant Bhagwan Baba's Palkhi welcomed at Kalyansagar Vidyalaya amidst a devotional atmosphere.
Shri Sant Bhagwan Baba's Palkhi welcomed at Kalyansagar Vidyalaya amidst a devotional atmosphere.

परंडा, दि. २० (रंगोली न्युज): Shri Sant Bhagwan Baba's Palkhi welcomed at Kalyansagar Vidyalaya amidst a devotional atmosphere. धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील कल्याणसागर समूहाच्या कल्याणसागर माध्यमिक विद्यालय व सरस्वती प्राथमिक शाळेच्या प्रांगणात रविवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता श्री संत भगवान बाबा यांच्या पालखीचे भक्तिभावपूर्ण वातावरणात आगमन झाले. पालखी आगमनानिमित्त विद्यालय परिसरात अध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या शुभहस्ते श्री संत भगवान बाबा यांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी सुजितसिंह ठाकूर यांनी सपत्नीक पालखीचे दर्शन घेऊन पूजन केले. तसेच त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनीही पालखीचे दर्शन घेत संत भगवान बाबांच्या चरणी श्रद्धा अर्पण केली.

या प्रसंगी परंडा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष तथा कल्याणसागर विद्यालय, डोमगावचे मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकूर, श्री संत भगवान बाबांचे चौथे वंशज कृष्णा महाराज, राजपूत महाराज, खेडकर गुरुजी, भगवान महाराज, अतुल महाराज शास्त्री, विवेक महाराज, संतोष महाराज, डॉ. आनंद मोरे, डॉ. पाटील, डॉ. जयश्री गोफणे, डॉ. कोरबू, डॉ. कांबळे, श्रद्धा बोराडे, शिंदे मॅडम, चव्हाण मॅडम, गायकवाड मॅडम, चव्हाण सिस्टर, सुखदेव ठोंपे, सौदागर टोपे, अविनाश विधाते, महावीर काशीद, संचालक जगदीश डाके, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, मुख्याध्यापक किरण गरड, तसेच कल्याणसागर समूहातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी आगमनानंतर उपस्थित भाविकांनी श्री संत भगवान बाबा यांच्या पालखीचे दर्शन घेत भक्तिभावाने पूजा-अर्चा केली. विद्यालय परिसरात जयघोष, भजन व नामस्मरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले होते. पालखी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांनाही संत परंपरेचा वारसा, अध्यात्म आणि संस्कार यांची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाचे नियोजन कल्याणसागर समूहाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरीत्या केले. उपस्थितांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेत समाधान व्यक्त करत श्री संत भगवान बाबा यांच्या कृपाशीर्वादाची प्रार्थना केली.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments