आशाताई मोरजकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित. ....
परंडा - दि. ९) भारतीय बौद्ध महासभा परंडा धम्मराजीका महाविहार (जि. धाराशिव) यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयं
ती निमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसचिव तथा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव शिवमती आशाताई गोरख मोरजकर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आयु. राजेंद्रकुमार निकाळजे यांच्या संकल्पनेतून तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर, धाराशिव जिल्हा सरचिटणीस ॲड. दिलीप निकाळजे, धाराशिव जिल्हा महिलाप्रमुख सुष्मा निकाळजे, संगिता निकाळजे, धाराशिव संरक्षण विभाग प्रमुख सिद्धार्थ उबाळे, परंडा तालुका अध्यक्ष जयंत चौतमहाल, सरचिटणीस सोनालीताई दाभाडे, महिला प्रमुख जयमाला ठोसर, कोषाध्यक्ष बालाजी रंदिल अश्विनीताई हावळे, दयानंद दाभाडे, सरस्वती दाभाडे, विनोद दाभाडे, सिद्धार्थ घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मराजीका महाविहार येथे त्यागमुर्ती माता रमाई जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माता रमाई जयंती निमित्त शिवमती आशाताई गोरख मोरजकर यांना समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्व जाती धर्मातील एकता अबाधित ठेवण्यासाठी तसेच परस्परातील बंधुता, प्रेमभाव, सामाजिक सलोखा आणि सुसंस्कृतपणा राखण्यासाठी विविध माध्यमांद्वारे सातत्याने दिलेल्या योगदानाबद्दल आपल्या कार्याच्या सन्मानार्थ आशाताईस समाजभूषण पुरस्कार सन्मानपुर्वक प्रधान करून गौरविण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!