परंड शहरात श्रीसंत गजानन महाराज यांच्या प्रगटदिन साजरा. ....
भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप. ....
परंडा - दि. ९) येथील शिक्षक सोसायटी मधील तिवारी प्लॉट येथे श्रीसंत गजानन महाराज मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे प्रकट दिनानिमीत्त अखंड हरिनाम सप्ताहाची दि. ८ रोजी ह.भ.प. धर्मराज दादा महाराज सामनगांवकर यांच्या काल्याच्या किर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजित या सप्ताहात सकाळपासूनच भक्त दर्शनासाठी उपस्थित होते. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी विजय ग्रंथ पारायण, हरिपाठ, भजन-कीर्तन व श्री भागवत कथेचे श्रवण मोठ्या श्रद्धेने संपन्न झाले. सप्ताहामध्ये विविध कीर्तनकार, प्रवचनकार व मान्यवर संताच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. “गण गण गणात बोते” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. सप्ताहाध्ये महाप्रसादचा सर्व भक्तांनी आस्वाद घेतला. या संपूर्ण सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळ, सेवेकरी, स्थानिक नागरिक व महिला मंडळाचे विशेष योगदान लाभले.
तसेच शहरातील संजय (आप्पा) काशीद व शिवाजी कदम यांच्या स्वगृही श्री संत गजानन महाराजांचा प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, आरती व भजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!