परंडा तालुक्यात ७१.६२ टक्के झाले मतदान. ....
मिनी मंत्रालयाच्या खुर्चीवर बसण्यासाठी कोण बाजी मारणार?
उद्याच्या मतमोजणीतुन होणार स्पष्ट. ....
परंडा - दि. ७) परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत समितीचे १० गणासाठी निवडणूक प्रक्रिया तुरळक घटना वगळता शांततेमध्ये पार पडली. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाचा कारभार हाकण्यासाठी जि.प. च्या ५ जागेसाठी ३० तर तालुक्याचा कारभार हसण्यासाठी प.स. च्या १० जागेसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यासाठी एकूण ७१.६२ टक्के मतदान झाले असून आता सोमवार दि. ९ रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्हा परिषद शेळगाव गट क्रमांक २९ मध्ये २१ हजार ७९९ मतदानातून त्यामध्ये ७१.९ टक्के मतदान झाले अनाळा गट क्रमांक ३० मध्ये १९ हजार ५९० मतदाना असून त्यामध्ये ७१.४१ टक्के मतदान झाले. जवळा (नि.) गट क्रमांक ३१ मध्ये २१ हजार २ मतदान असून त्यामध्ये ७४.२७ टक्के मतदान झाले. डोंजा गट क्रमांक ३२ मध्ये २२ हजार ३७६ मतदान असून त्यामध्ये ६९.९९ टक्के मतदान झाले तर लोणी गट क्रमांक ३३ मध्ये २२ हजार ४८९ मतदान होते त्यामध्ये ७१.४४ टक्के मतदान झाले आहे तालुक्यामध्ये एकूण १ लाख ७ हजार २५६ मतदानापैकी ७६ हजार ८१२ इतके मतदान झाले असून एकूण ७१.६२ टक्के मतदान झाले आहे. मिनी मंत्रालयाचा कारभार हाकण्यासाठी निवडणुकीच्या फडात आता कोण बाजी मारणार याकडे आता सोमवार दि. ९ रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
![]() |
| मा. मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातील मुगांव येथे बजाववला मतदानाचा हक्क बजावला. |
मा. मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातील मुगांव येथे बजाववला मतदानाचा हक्क बजावला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!