श्री काळभैरवनाथ यात्रेनिमीत्त जत्रेतील कुस्त्यांचा फड रंगला.
यात्रेनिमीत्त कुस्त्यांच्या आखाड्याला अणेक वर्षाची परंपरा.
![]() |
| On the occasion of the Shri Kalbhairavnath Yatra, the wrestling arena at the fair came alive with spirited bouts. |
On the occasion of the Shri Kalbhairavnath Yatra, the wrestling arena at the fair came alive with spirited bouts. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सोनारी येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त कुस्तीचा आखाडा भरविण्याची मागील कित्तेक वर्षाची परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे. त्यानुसार दि. १६ फेब्रुवारी रोजी जंगी कुस्त्यांचा फड भरविण्यात आला होता. यात धाराशिव सह, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अकलूज, पुणे यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सुमारे पाचशे पेक्षा जास्त पैलवानांनी कुस्त्यांचा फड रंगत आणला.
महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक भक्तांचे कुलदैवत श्री काळभैरवनाथाच्या "Shri Kalbhairavanath" यात्रेची सांगता दि. १६ एप्रिल रोजी कुस्तीच्या फडाने झाली. यात्रेतील कुस्ती हा केवळ खेळाचा भाग नसून या निमीत्ताने येथील संस्कृती, इतिहास व भक्तीचा फक भाग आहे. ग्रामस्थांच्या व यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेनिमीत्त जोरदार तयारी करण्यात आली होती. भैरवनाथ गुरु गादीचे मठाधीश पीर योगी शामनाथ महाराज, भैरवनाथ देवस्थानाचे समीर पुजारी, संजय पुजारी यात्रा कमिटी अध्यक्ष धनंजय सावंत, सरपंच परमेश्वर मांडवे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष युवराज पाटील, ईश्वर मोरे, बापु मांडवे, जयराम नलवडे, अविनाश ईटकर, नितीन गाढवे, धोंडीराम पवार आदी मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कुस्त्याच्या आखाड्यास सुरुवात झाली.
प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी सोनारी येथील विजय मांडवे आणि इंदापूर येथील तात्या झूमाळे या दोघांच्या लढतीत पोकळ घिसा या डावावर विजय मांडवे विजयी झाला. द्वितीय बक्षिसासाठीची कुस्ती श्रीनिवास पाथरूट व रवींद्र खैरे यांच्यात झाली बराच वेळ दोघात लढत चालू होती अखेर पंचांच्या मध्येस्तीने कुस्ती बरोबरीने सोडविण्यात आली. त्याचबरोबर भैय्या धुमाळ, बापु चंदणकर, रितेश भगत, पियुष वाडेकर, रोहीत ढिगारे, अर्जुन सावंत, अभि ननवरे, सुमित माने आदीं मल्लंच्या कुस्त्या चित्तथरारक पाहावयास मिळाल्या.
यावेळी जिल्हापरिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती "Chairman, Agriculture and Animal Husbandry Committee, Zilla Parishad" भाऊसाहेब खरसडे, स.पो.नि गोरक्षनाथ खरड, बाळासाहेब आवारे, बाबासाहेब पाटील, गुरूदास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कुस्त्यांचा फड यशस्वी पार पाडण्यासाठी पैलवान रवी मांडवे, उदयोजक सचिन पवार, महादेव सांगडे, दादा ईटकर, भास्कर ईटकर, राम इटकर, परमेश्वर पवार आदींनी पुढाकार घेतला.
👉पंच-
![]() |
| On the occasion of the Shri Kalbhairavnath Yatra, the wrestling arena at the fair came alive with spirited bouts. |
पंच म्हणून पैलवान विजय धुमाळ, सोनबा गिरी, दिपक पाटील, अविराज नलवडे, जालिंदर मुरकुटे, किरण मोरे, आबासाहेब हांगे, दत्ता हांगे, बबलू गटकूळ, रामा गायकवाड, बालाजी मिस्कीन, प्रदीप पाडुळे आदींनी काम पाहिले.
👉कुस्त्यांची रंगत-
दुपारी सुरू झालेल्या कुस्त्यांचा फड उशीरा पर्यंत रंगला होता. यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने श्री काळभैरवनाथ भक्त निवासासमोरील मैदानात एकाच वेळी पाच कुस्त्या खेळविता येतील, असा आखाडा बनविण्यात आला होता. हा कुस्त्यांचा फड दुपारी चार पासून रात्री दहापर्यंत रंगला. कुस्त्यांचे समालोचन दिनेश गवळी आणी रविकांत जाधव यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

.jpeg)
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!