Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम. ....

परंडा येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम. ....

परंडा दि. १६) विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

      छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती जिजाऊ ब्रिगेड च्या संकल्पनेतून महिलांसाठी विशेष कार्यक्रम वैचारीक मनोरंजनातुन "जिंका पैठणी" या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी दि.१८ रोजी करण्यात येणार आहे. तर दि. १९ रोजी मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड आयेजीत छत्रपती शिवाजी महाराजभव्य जन्मोत्सव सोहळा परंडा येथील छत्रपती शिवाजी चौक येथे साजरा करण्यात येणार आहे. दि. १८ रोजी सायंकाळी दिपोत्सव कार्यक्रमानंतर सहभागी स्पर्धकांची बौद्धीक चाचणी घेऊन यामधून १५ स्पर्थकांची निवड केली जाणार आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसुबाई व महाराणी ताराबाई यांच्या जीवन कार्यावर या स्पर्धेत प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रथम बक्षिस ५ नग मिक्सर व पर्स, द्वितीय बक्षिस ५ नग कुकर व तृतीय बक्षिस ५ नग स्टीलचा टब असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत महिलांनी मोठयासंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने करण्यात आले आहे.




आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी.... 

रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com

-: शहाजी कोकाटे :-

मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments