धरण उशाला कोरड शेतीच्या पिकाला! . .....
सततच्या खंडीत विजपुरवठ्याकडे अधीकारी, कर्मचारी, पुढाऱ्यांचे दुर्लक्ष. .....
शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांमध्ये तिवृ नाराजी. .....
परंडा - दि. १६) परंडा तालुक्यातील सिनाकोळेगाव प्रकल्प हरणओढा परिसरातिल भोंजा, कुंभेजा, कौडगाव, खनापूर परिसरातील शेतकऱ्यांना कायमच सतत खंडीत होत असलेल्या विजपुरवठ्यामुळे उन्हाळा सुरू होण्या अगोदरच शेती पिकांना, पशुधनाला व विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असून याकडे म.रा.वि.वि. कंपनीसह राजकिय पुढाऱ्यांचे दुर्लक्ष दिसुन येत असल्याने शेतकरी ग्रामस्थांमधुन मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
दशकापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याच्या वाट्याला पाचविला पुजलेला दुष्काळ परंडा तालुक्यातील विविध सिंचन व्यवस्थेसह जिल्ह्यातील एकमेव १५०.४९ द.ल.घ.मी असलेला सिनाकोळेगाव प्रकल्प शेतकऱ्यांसह सर्वांनाच वरदान ठरला. त्यामुळे परिसरात साखर कारखाण्यासह अणेक छोटेमोठे उद्योग सुरू झाले. खास करून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या सिनाकोळेगाव प्रकल्प शेतीपिकांसाठी मोठा फायद्याचा ठरतो. त्यामुळे मागील दहा वर्षामध्ये तालुक्यातील ऊस उत्पादन फळपिकांसह इतर पिके, पशुधन व त्यामुळे दुध उत्पादन यामध्ये वाढ होऊ लागली.
![]() |
| ऊसाच्या एक सरीतुन पाणी बाहेर पडण्या अगोदर विज गायब. ...... |
अधीकारी, कर्मचारी व पुढाऱ्यांचे दुर्लक्ष. .....
सततच्या खंडीत विजपुरवठ्यामुळे परंडा तालुक्यातील भोंजा, कुंभेजा, खनापूर, कौडगाव सह हरणओढा परिसरातील शेतकरी सतत खंडीत विजपुरवठ्यामुळे ग्रासलेले आहेत. याकडे म.रा.वि.वि.कं. चे अधिकारी, कर्मचारी व राजकीय पुढारी यांचे दुर्लक्ष दिसुन येत असल्याची शेतकरी नागरीकांमध्ये चर्चा दिसून येत आहे.
[ ] शेतकरी कायमच आर्थिक संकटात असतो. त्याच्या शेती मालाला हमी भाव तर मिळतच नाही. ऊसाची बिले वेळेवर मिळत नाही. अशा अणेक समस्या समोर असताना संध्या लाईट ची समस्या सतत भेडसवत आहे. सतत विज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विजपुरवठ्या अभावी ग्रामीण विद्यर्थ्यांच्या शैक्षणिक जिवणावर देखील मोठा परिणाम होत आहे. यावर वेळीच शासनाने उपाय योजना करावी. ..... रवी मोरे (भोंजा)
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!