Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

रोहकल येथे महाशिवरात्री निमीत्त अखंड हरिनाम सप्ताह. .... पंचक्रोशीतील भक्त रोहकलेश्वरच्या दर्शनाला. .....

रोहकल येथे महाशिवरात्री निमीत्त अखंड हरिनाम सप्ताह. ....

पंचक्रोशीतील भक्त रोहकलेश्वरच्या दर्शनाला. .....

परंडा - दि. १५) परंडा तालुक्यातील रोहकलेश्वर मंदिरावरून नाव असलेल्या रोहकल येथे महाशिवरात्री निमीत्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून दि. १६ रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नगरे यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती होणार आहे.

      परंडा तालुक्यातील रोहकल येथील पुरातन ग्रामदैवत रोहकलेश्वर देवस्थानाचे महात्म्य आहे. श्रावण महीण्यामध्ये व महाशिवरात्रीला भावीक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी असे.  जिर्णोदार केलेल्या परंडा पासून १७ कि.मी अंतरावर रोहकल येथील मंदीरामध्ये रोहकलेश्वरचा मुखवटा असलेले शिवलिंग आहे.


         ग्रामस्थांच्या वतीने दि. ९ ते १६ फेब्रुवारी या कालावधी मध्ये हरिनाम सप्ताह सुरू असून काकडा, शिवलिला पारायण, भावार्थ रामायण, प्रवचण, हरिपाठ, भजन, हरिकिर्तन, हरिजागर असे भक्तीमय कार्यक्रमा संपन्न होत आहेत. आज दि. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र निमीत्त पंचक्रोशितील शिवभक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने भक्तीमय वातावरणामध्ये स्वागत केले जाते.




आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी.... 

रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com

-: शहाजी कोकाटे :-

मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments