Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ज्वारीच्या सुगीला परंडा तालुक्यात भलरी ने झाली सुरवात. .....,Rangoli News1

ज्वारीच्या सुगीला परंडा तालुक्यात भलरी ने झाली सुरवात. .....,Rangoli News1

ज्वारीच्या सुगीला परंडा तालुक्यात भलरी ने झाली सुरवात. .....,Rangoli News1

परंडा - दि. १७) परंडा तालुक्यात ज्वारीच्या सुगीचे प्रमाण कमी झाले असले तरी सध्या रब्बी हंगाम ज्वारीच्या सुगीला सुरवात झाली असून ज्वारीचे कोठार म्हणुण ओळख असणाऱ्या परंडा तालुक्यातील  लोणारवाडी येथील जामदारे कुटूंबाने पारंपारीक ज्वारीच्या पिकाला महत्व देत दि. १७ रोजी जोडीने मजुरांमार्फत भलरी ने ज्वारीच्या सुगीला सुरवात केली आहे.

        दशकापुर्वी सिंचना अभावी परंडा तालुक्यातील कोरडवाहु शेतामध्ये ज्वारीचे पिक डौलात यायचे. हुरड्यात आलेल्या ज्वारीचा हुरड्याचा अस्वाद घेण्यासाठी मित्रपरिवार, पाहुणे रावळे हुरडा पार्टीत दंग असायचे. ते दिवस आता दुर्मीळ होत आहेत.

      परंतु ज्वारीच्या सुगीचे चित्र परंडा तालुक्यातील लोणारवाडी येथील शेतकरी मारूती बापुराव जामदारे व बाळासाहेब बापुराव जामदारे यांनी रब्बी हंगामातील ज्वारी च्या सुगीला जोमात सुरूवात केली आहे. यांनी रब्बी हंगामातील ज्वारी ला प्राधान्य देऊन पारंपरिक पद्धतीने शेती जोपासुन कडबा हा मोठ्या प्रमाणात जनावरांचे खाद्य (वैरण) वर्षेभर पुरवणी लावून पशुंचे देखील संगोपन उत्तम प्रकारे करत आहेत. जोडी ने  "भलगडी दादा भलरी" म्हणत सुगीला जोमात सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी.... 

रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com

-: शहाजी कोकाटे :-

मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments