![]() |
| कल्याणसाग माध्यमिक विद्यालयातील स्वयंशासन दिन |
कल्याणसागर मा. विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा. .....
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर गुणवत्ता वाढीसाठी करावा. ... मा.आ. सुजितसिंह ठाकूर
परंडा-दि. १७) सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त गुणवत्ता वाढीसाठी करावा त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न होण्याची गरज आहे, तसेच नवीन AI तंत्रज्ञान भविष्यात महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन कल्याणसाग माध्यमिक विद्यालयातील स्वयंशासन दिनानिमित्त माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.
श्रीकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ परंडा संचलित कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा येथील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. १७ रोजी आयोजित शुभेच्छा समारंभात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत म्हणून कल्याणसागर समुहाच्या सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी, कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक, भाजपा धाराशिव जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, सौ हेमा ठाकूर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते स्वयंशासन दिनाचे पदाधिकारी मुख्याध्यापक श्रेयश कदम, शिक्षणाधिकारी (मा.) आक्सा खान, (प्रा.) आदीती ठाकूर, उपशिक्षणाधिकारी श्रावणी लवटे, उपमुख्याध्यापक वीर मिश्रा, प्रज्वल सरवदे, आयुष कोकाटे, समर्थ भोसले गटशिक्षणाधिकारी जान्हवी कुलकर्णी, विस्तार अधिकारी अलफिया चाँद पठाण, आयुष कुलकर्णी, केंद्रप्रमुख निकीता मदने, लिपीक प्राची जाधव, राजकन्या फंड शिक्षक प्रतिनिधी अविष्कार वडतिले, अर्णव पाटील, रोहित गवारे, सोहम शहा, प्रणव मोरे, तुषार वाघमारे, शिक्षिका प्रतिनिधी बिस्मील्ला जिनेरी, प्रगती गटकुळ, प्रांजली हागवणे, मधुरा मुळीक, फिजा बागवान, रोहिणी मुळीक, सानिया नदाफ, तंजिया शेख, अल्फिया मो. पठाण, मैथली मेहता, आलीया मन्सुर पठाण, सोनाली शिनगारे, यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यालयातील सर्व शिक्षक मुकुंद भोसले, चंद्रकांत तनपुरे, महादेव नरुटे, अजित गव्हाणे, रोहित रासकर, ऐश्वर्या कुलकर्णी सेवक सतिश चौधरी, सागर काळे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी व सौ. हेमा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड यांनी केले तर सूत्रसंचालन अनुष्का माळी, सानिया नदाफ व समीक्षा भिसे यांनी व आभार अनुष्का माळी यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!