Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा येथे जिजाऊ ब्रिगेडची तालुका कार्यकारिणी जाहीर. ..... परंडा तालुकाध्यक्ष पदी राणी भिल्लारे तर शहराध्यक्ष पदी अक्षता टकले. .....Rangoli News1

Rangoli News1
परंडा येथे जिजाऊ ब्रिगेडची तालुका कार्यकारिणी जाहीर
परंडा येथे जिजाऊ ब्रिगेडची तालुका कार्यकारिणी जाहीर. .....
Rangoli News1

परंडा तालुकाध्यक्ष पदी राणी भिल्लारे तर शहराध्यक्ष पदी अक्षता टकले. .....

परंडा - दि. १८) छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त झालेल्या महिलांच्या नियोजन बैठकीमध्ये दि. १७ रोजी जिजाऊ ब्रिगेडची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रच्या प्रदेश सहसचिव आशाताई मोरजकर, जिल्हा उपाध्यक्ष रामकुंवरताई रगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व धाराशिव जिल्हाध्यक्ष रेखाताई पवार यांच्या सहीने राणी हरीदास भिल्लारे यांची परंडा तालुकाध्यक्ष पदी तर अक्षता गणेश टकले यांची परंडा शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

         तसेच तालुका सचिव प्रियतमा शिंदे, तालुका उपाध्यक्ष पल्लवी होरे, तालुका कार्याध्यक्ष रेश्मा खुळे, तालुका कोषाध्यक्ष पुनम गिरवले, तालुका सहसचिव राणी कोळगे, शहर सचिव संध्या सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली. 

      प्रदेश सहसचिव आशाताई मोरजकर व जिल्हा उपाध्यक्ष रामकुंवरताई रगडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. बैठकीच्या वेळी मनिषा जगताप, संगिता मुळूक, सुरेखा  करळे, भक्ती खरसडे, कल्पना मोरे, अर्चना भांडवलकर उपस्थित होत्या. 

           नवनिर्वाचीत सर्वच पदाधिकारी शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करत आहेत. समाज परिवर्तनाबद्दलची तळमळ, संघटनात्मक कौसल्य, निर्णायक क्षमता, महिलांचे संघटन व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी असलेली धडपड या सर्व कामाची जिजाऊ ब्रिगेडने दखल घेऊन या सर्वांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....

रंगोली न्युज 👉https://rangolinews1.blogspot.com

-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396


Post a Comment

0 Comments