ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा शहरातील ९ चौकामध्ये पुतळे, स्मारक, चौक सुशोभिकरण निषयाचा ठराव बहुमताने मंजुर. A resolution regarding the installation of statues and memorials, as well as the beautification of nine squares in Paranda city, has been approved by a majority vote.

परंडा शहरातील ९ चौकामध्ये पुतळे, स्मारक, चौक सुशोभिकरण निषयाचा ठराव बहुमताने मंजुर.

A resolution regarding the installation of statues and memorials, as well as the beautification of nine squares in Paranda city, has been approved by a majority vote.
A resolution regarding the installation of statues and memorials, as well as the beautification of nine squares in Paranda city, has been approved by a majority vote.

रंगोली न्युज - परंडा दि. ९)

महापुरूषांचे पुतळे उभा करणे, स्मारक उभारणे, व चौक सुशोभीकरण करण्यास ना-हरकत प्रमाणपत्र देणे या विषयावर दि. ८ एप्रिल २०२६ रोजी परांडा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यामध्ये परंडा शहरातील ९ चौकामध्ये पुतळे, स्मारके, चौक सुशोभिकरण करण्यास ना-हरकत देणे या विषयावरचा ठराव बहुमताने मंजुर करण्यत आला. तशी माहीती नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दिली.

    दि. १ एप्रिल रोजी च्या सर्वसाधारण सभेच्या पत्रानुसार परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, टिपू सुलतान चौक, महाराणा प्रताप चौक, निळा झेंडा चौक, व इतर चौकामध्ये महापुरूषांचे पुतळे उभारणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याविषयी दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार १) छत्रपती शिवाजी महाराज चौक, न्यायालयासमोर, २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नवीन तहसील जवळ, ३) महाराणा प्रताप चौक, बावची चौक, ४) संत शिरोमणी सेना महाराज चौक, खासापुरी चौक, ५)छत्रपती संभाजी महाराज चौक, सोनारी चौक, ६) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, पाचपिंपळा चौक, ७) निळा झेंडा चौक, देवगाव रस्ता, समता नगर, ८) माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, कुर्डूवाडी रस्ता, पल्ला गल्ली, व ९) टिपू सुलतान चौक, शिकलकर गल्ली या ठिकाणी महापुरूषांचे पुतळे, स्मारक उभारणे, चौक सुशोभीकरण करण्यास ना-हरकत प्रमाणपत्र देणे या विषयावर आयोजित सर्वसाधारण सभेमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकुर व न.प पाणीपुरवठा सभापती रमेशसिंह परदेशी यांनी असे मत मांडले की, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुतळा उभारण्यात यावा व उर्वरित ठिकाणी शासनाकडून अधिकृतरित्या महापुरुष आणि थोर पुरुष यांच्या नावाची सूची (यादी) उपलब्ध करून सर्व सदस्यांना त्याची माहिती द्यावी. त्यानंतर विविध संघटन व समाजाच्या महापुरूषांचे पुतळे उभारण्याची मागणी आहे याबाबत चा विषय नंतरच्या सभेत घेण्यात यावेत असे मत मांडले. वरील ९ ठिकाणी महापुरूषांचे पुतळे उभारणी करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबबतचा ठराव आयोजीत सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुर झाल्याचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी सांगीतले.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments