महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे सत्कार समारंभ.

Felicitation Ceremony at Mahatma Gandhi Vidyalaya, Paranda.
Felicitation Ceremony at Mahatma Gandhi Vidyalaya, Paranda.

रंगोली न्युज - परंडा दि. ८) महात्मा गांधी विद्यालया परंडा येथे धाराशिव जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भाऊसाहेब खरसडे तर पंचायत समिती सभापती पदी अर्चना जाधव यांची निवड झाल्याबद्दल महात्मागांधी विद्यालयाच्या  वतीने जि.प. सभापती भाऊसाहेब खरसडे व आण्णासाहेब जाधव यांचा मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते हार, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

   तसेच परंडा पंचायत समिती नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य, अमोल सुभाष नलवडे मुळूक माजी चेअरमन खाजगी सोसायटी परांडा, कोकणे, मुळे साहेब डेपो मॅनेजर परंडा,  घोगरे साहेब सहाय्यक डेपोमॅनेजर परांडा यांचाही प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमा वेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण ठाणंबीर मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन गरड सर यांनी केले.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!