बावची विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक; इयत्ता ५ वी व ८ वीचे ३९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

Bavchi School Secures First Rank in the Taluka in Scholarship Examination; 39 Students from 5th and 8th Grades Qualify for Scholarships.
Bavchi School Secures First Rank in the Taluka in Scholarship Examination; 39 Students from 5th and 8th Grades Qualify for Scholarships.

परंडा दि. १८ (रंगोली न्यूज) : 

Bavchi School Secures First Rank in the Taluka in Scholarship Examination; 39 Students from 5th and 8th Grades Qualify for Scholarships. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील बावची विद्यालय, परंडा येथे इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ चा निकाल आज जाहीर झाला असून विद्यालयाने तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विद्यालयाने पुनश्च एकदा उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.

या परीक्षेमध्ये इयत्ता ५ वीचे ४४ पैकी २७ विद्यार्थी तर इयत्ता ८ वीचे २८ पैकी १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. सदर विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले गुण हे ३०० पैकी असून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांना संदीप अनभुले, सचिन लावंड, सुरज वळवी व यमुना सायकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना विकास वाघमारे, गोकुळ मासाळ, सचिन मोरे व गरड मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण सराव, विद्यार्थ्यांची मेहनत व पालकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले असल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिभिषण रोडगे तसेच प्राचार्य नारायण खैरे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी (३०० पैकी गुण)

१) कु. काळे सदिच्छा प्रदीप – २३६

२) कु. मार्तंडे आध्या हनुमंत – २२६

३) कु. गवळी अवंती राहुल – २०४

४) कु. तिडके आर्यन माधव – १९६

५) कु. शेख मोहम्मद नवाज मुदस्सर – १९६

६) कु. जाधव वेदांत कल्याण – १९६

७) कु. भानवसे अविष्कार तानाजी – १९४

८) कु. शेख दानिश नाजेम – १८८

९) कु. कुलकर्णी अनुराग अभय – १८२

१०) कु. भोगील सार्थक हनुमंत – १८२

११) कु. इनामदार फसिओदिन फैयाज – १७८

१२) कु. सोनवणे रणजित प्रकाश – १७६

१३) कु. बुलबुले युवराज संतोष – १७६

१४) कु. डोके राज प्रमोद – १७४

१५) कु. सय्यद खालेक वसीम – १५८

१६) कु. पाटील माधुरी सुनिल – १५८

१७) कु. कोळी प्रणव धर्मा – १५८

१८) कु. धस अर्णव अमोल – १५६

१९) कु. मेहेर प्रतिक्षा किरण – १५६

२०) कु. पठाण अतिफ इरफानखा – १५४

२१) कु. शेख मुस्तकिम समीर – १४६

२२) कु. नाईक तेजस दत्ता – १४६

२३) कु. जेधे कुबेर आकाश – १४२

२४) कु. पाटील परिक्षित प्रविण – १४२

२५) कु. नरके कल्याणी अनिल – १२८

२६) कु. जोडवे सोहम समाधान – १२८

२७) कु. हांगे ओमराज कैलास – १२४

इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी (३०० पैकी गुण)

२८) कु. देवकर संस्कृती समाधान – २५०

२९) कु. सातपुते प्राप्ती संभाजी – २३६

३०) कु. नलवडे अक्षरा महेश – २०४

३१) कु. काळे श्रेयश रामदास – २०२

३२) कु. लटके श्रुतिकी अमितकुमार – १९८

३३) कु. शिंदे राजनंदिनी रमेश – १९२

३४) कु. नाईकवाडी कादंबरी श्रीराम – १९०

३५) कु. पाटील प्रणव विनोद – १७८

३६) कु. करळे सिद्धी सुदाम – १७८

३७) कु. पाटील अथर्व जयवंत – १७२

३८) कु. खैरे हर्षद रामचंद्र – १४६

३९) कु. मासाळ सई गोकुळदास – १४२


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!