चिंचपूर (ढगे) येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश
परंडा दि. १९ (रंगोली न्यूज) :
Public Induction of Activists from Chinchpur (Dhage) into the BJP भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील विविध पक्ष व संघटनांशी संबंधित कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. परंडा येथील भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, दत्ता मोहीते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख सुधीर ढगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिगंबर ढगे, हिरालाल ढगे, शेषराव ढगे, गणेश कावळे, बाबासाहेब अंधारे, शिवसेना (उ.बा.ठा.) माणकेश्वर विभागप्रमुख प्रमोद ढगे, अविनाश ढगे, मधुकर ढगे, अमर हेळकर, तानाजी ढगे, चैतन्य ढगे, सागर ढगे, निलेश ढगे, पुंडलिक ढगे, समाधान ढगे, रामभाऊ ढगे, गणेश ढगे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या जनहिताच्या योजनांमुळे सामान्य नागरिकांचा भाजपावर विश्वास वाढत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी अधिकाधिक कार्यकर्त्यांनी भाजपाशी जोडले जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!