मंडई पेठेतील अतिक्रमण हटवून नाली कामाला सुरुवात; नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांची तातडीची कारवाई

Encroachments Cleared in Mandai Peth to Commence Drainage Work; Immediate Action Taken by Council President Zakir Saudagar.
Encroachments Cleared in Mandai Peth to Commence Drainage Work; Immediate Action Taken by Council President Zakir Saudagar.

परंडा - दि. २० (रंगोली न्यूज)

Encroachments Cleared in Mandai Peth to Commence Drainage Work; Immediate Action Taken by Council President Zakir Saudagar. धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील ऐतिहासिक भूईकोट किल्ला परिसरातील मंडई पेठ भागातील अतिक्रमण अखेर प्रशासनाने हटवले असून परिसरातील स्वच्छता व नाली कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नावर नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पुढाकार घेत तातडीने कारवाई केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

परंडा शहरातील मंडई पेठ हा जुन्या बाजारपेठेचा मुख्य व गजबजलेला भाग मानला जातो. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक व व्यापाऱ्यांची वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी, पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होणे तसेच अस्वच्छतेच्या समस्या गंभीर बनल्या होत्या. यामुळे स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला सूचना देत कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या पुढाकारातून मंडई पेठ परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले असून पावसाळ्यापूर्वी पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी आवश्यक असलेल्या नालीच्या कामालाही प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

या कामाच्या शुभारंभ व पाहणी प्रसंगी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्यासमवेत इरफान शेख, जावेद पठाण, परिसरातील नागरिक तसेच नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेच्या या कारवाईचे स्वागत करत मंडई पेठ परिसर अधिक स्वच्छ व सुस्थितीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!