ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शेतरस्ते खुले करून देण्यासाठी महसून प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर. पावसाळ्यापुर्वी खरीप हगांम शेतीमशागत साठी महसुल प्रशासनामुळे शेत रस्त्याला मोकळा श्वास. नायब तहसिलदार पुजा गोरे यांची जवळा नि. मंडळात प्रत्यक्ष स्थळ पहाणी करून शेतरस्ता अंमलबजावनी. Deputy Tehsildar Pooja Gore implements the farm road project in the Jawala N. Circle following an on-site inspection.

शेतरस्ते खुले करून देण्यासाठी महसून प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर.

पावसाळ्यापुर्वी खरीप हगांम शेतीमशागत साठी महसुल प्रशासनामुळे शेत रस्त्याला मोकळा श्वास.

नायब तहसिलदार पुजा गोरे यांची जवळा नि. मंडळात प्रत्यक्ष स्थळ पहाणी करून शेतरस्ता अंमलबजावनी.

Deputy Tehsildar Pooja Gore implements the farm road project in the Jawala N. Circle following an on-site inspection.
Deputy Tehsildar Pooja Gore implements the farm road project in the Jawala N. Circle following an on-site inspection.

परंडा दि. २२ (रंगोली न्युज)

Deputy Tehsildar Pooja Gore implements the farm road project in the Jawala N. Circle following an on-site inspection. परंडा येथील तहसिलदार निलेश काकडे यांच्या आदेशानुसार नायब तहसिलदार पुजा गोरे यांनी दि. २१ व २२ मे रोजी जवळा नि. महसूल मंडळातील विविध गावांमध्ये शेतरस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या प्रश्नांवर तातडीने कारवाई सुरू केली असून प्रत्यक्ष स्थळपहाणी करून शेतरस्ता अंमलबजावणी करण्यात आली.

 

Deputy Tehsildar Pooja Gore implements the farm road project in the Jawala N. Circle following an on-site inspection.
Deputy Tehsildar Pooja Gore implements the farm road project in the Jawala N. Circle following an on-site inspection.

    दि. २१ मे रोजी परंडा तालुक्यातील घारगाव व सिरसाव परिसरातील शेतरस्त्यांची पाहणी करण्यात आली, तर दि. २२ मे रोजी भांडगाव, सिरसाव व जवळा नि. शिवारातील रस्त्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी वादमुक्त रस्ता उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

       महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राज्यभर शेतरस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी परंडा तालुका महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

     परंडा तहसिलदार निलेश काकडे यांच्या आदेशानुसार नायब तहसिलदार पुजा गोरे यांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वहिवाटीचे वाद, बंद झालेले रस्ते, सीमांकनातील अडचणी आणि शेतात जाण्यासाठी निर्माण झालेल्या अडथळ्यांबाबत त्यांनी संबंधित कर्मचारी यांना आवश्यक सूचना दिल्या.

या मोहिमेमुळे ग्रामस्तरावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून महसूल प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना निर्माण झाली आहे.

      यावेळी जवळा नि. मंडळाधिकारी स्वामी, ग्राम महसूल अधिकारी सिरसाव, घारगाव व जवळा नि. येथील अधिकारी, परंडा तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक तानाजी भोजणे व महसूल सहाय्यक मोरीलवाड उपस्थित होते.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments