ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा न्यायालयात “असुरक्षित साक्षीदार केंद्र” चे उद्घाटन Inauguration of "Vulnerable Witness Centre" at Paranda Court

परंडा न्यायालयात “असुरक्षित साक्षीदार केंद्र” चे उद्घाटन

Inauguration of "Vulnerable Witness Centre" at Paranda Court
Inauguration of "Vulnerable Witness Centre" at Paranda Court

परंडा दि. २३ (रंगोली न्यूज) – 

Inauguration of "Vulnerable Witness Centre" at Paranda Court धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दि. २३ मे रोजी “असुरक्षित साक्षीदार केंद्र” चे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा उपस्थित होते.

या केंद्राच्या माध्यमातून साक्षीदारांना भयमुक्त वातावरणात व कोणत्याही दबावाशिवाय साक्ष नोंदविता येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

उद्घाटन कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) ए. ए. शेख, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) डी. जी. जगताप, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रवीण गाडे, परंडा विधिज्ञ संघाचे कार्याध्यक्ष ॲड. सुहास पाटील, नायब तहसीलदार श्रीमती पूनम पाटील, उपअभियंता श्रीमती वडगावे, कनिष्ठ अभियंता सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परंडा विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड. हनुमंत घोगरे व महिला सदस्य बालिका बनसोडे, सचिव ॲड. अजित महाडिक, जेष्ठ विधीज्ञ ॲड. दादासाहेब खरसडे, ॲड. आय. डी. शेख, ॲड. एस. आर. काळे, ॲड. नुरोद्दीन चौधरी ॲड. हनुमंत वाघमोडे, ॲड.संदीप पाटील, ॲड. दत्तात्रय सूर्यवंशी, नागनाथ सूर्यवंशी, ॲड. संतोष सूर्यवंशी, ॲड. विवेक काळे, ॲड.बापू जामदारे, ॲड.अमोल पाटील, आप्पासाहेब जगताप, ॲड. अमोल करळे, ॲड.सुनिल शिंदे, श्रीकृष्ण सोनमाळी ॲड. राहुल वाघमारे, आफताब शहाबर्फीवले, ॲड.महेश चोपडे, किशोर खबाले, ॲड. तानाजी गरड, न्यायालयीन अधीक्षक शहाजी दळवे, सहाय्यक अधीक्षक नेताजी पेठे, श्रीम. मीना पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधीज्ञ संघाचे कार्याध्यक्ष ॲड. सुहास पाटील यांनी तर सूत्रसंचालन ॲड. संतोष सूर्यवंशी व व्ही. एम. काळे यांनी केले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments