ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

पाचपिंपळा ग्रामस्थांकडून नवनियुक्त PSI नामदेव खैरे यांचा भव्य नागरी सत्कार Grand Civic Felicitation of Newly Appointed PSI Namdev Khaire by the Villagers of Pachpimpla

पाचपिंपळा ग्रामस्थांकडून नवनियुक्त PSI नामदेव खैरे यांचा भव्य नागरी सत्कार

Grand Civic Felicitation of Newly Appointed PSI Namdev Khaire by the Villagers of Pachpimpla
Grand Civic Felicitation of Newly Appointed PSI Namdev Khaire by the Villagers of Pachpimpla

परंडा - दि. १८ (रंगोली न्युज)

Grand Civic Felicitation of Newly Appointed PSI Namdev Khaire by the Villagers of Pachpimpla धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पाचपिंपळा गावचे सुपुत्र नामदेव श्रीमंत खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने दि. १७ रोजी पाचपिंपळा येथे भव्य नागरी सत्कार व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात नामदेव खैरे यांच्या आई-वडील तसेच सासू-सासरे यांच्या सत्काराने झाली. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर गावातून ढोल-ताशांच्या गजरात व जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत नामदेव खैरे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

यावेळी परंडा तालुका गटविकास अधिकारी रवींद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले तसेच श्री क्षेत्र सामनगावकर येथील हभप धर्मराज दादा महाराज यांनी मनोगत व्यक्त करत नामदेव खैरे यांच्या यशाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही मान्यवरांनी केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून हभप धर्मराज दादा महाराज, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, गटविकास अधिकारी रवींद्र जाधव, कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, तलाठी विष्णू जाधव, तलाठी वाघमारे, ग्रामसेवक श्रीमती शिंदे, पंचायत समिती सदस्या दिपाली खुळे, बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र जाधव, विश्वनाथ आबा खुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच कालिदास खैरे, अंगद धुमाळ, नवनाथ खैरे, बाळनाथ खैरे, हनुमंत धुमाळ, महेश खुळे, बाळासाहेब अंधारे, दत्ता धुमाळ, रामेश्वर रेवडकर, राजू कोळगे पाटील, अनंत धुमाळ, पोलीस पाटील कमलाकर खैरे, अशोक खैरे, अण्णा बारस्कर, समाधान खैरे, दिनकर खैरे, हनुमंत खैरे, नारायण खैरे, गणेश शिंदे, ज्ञानेश्वर नुसते, मित्रपरिवार, पाहुणेमंडळी व पाचपिंपळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समाधान खुळे यांनी केले. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments