परंडा तालुक्यातील कपीलापुरी येथे दुर्दैवी घटना; विजेचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू
विद्युत पंप पाण्यातून बाहेर काढताना काळाचा घाला; परिसरात शोककळा
![]() |
| Tragic Incident in Kapilapuri, Paranda Taluka: Two Farmers Die on the Spot After Suffering Electric Shocks |
परंडा दि. २९ (रंगोली न्यूज) – Tragic Incident in Kapilapuri, Paranda Taluka: Two Farmers Die on the Spot After Suffering Electric Shocks धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कपीलापुरी येथे शुक्रवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. शेतातील विद्युत पंप पाण्यातून बाहेर काढत असताना विजेचा तीव्र शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कपीलापुरी येथील शेतकरी अनिल श्रीधर देवळकर (जैन) यांच्या शेतातील विद्युत पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. सदर पंप पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अनिल देवळकर आणि अक्षय बिभीषण कुंभार हे दोघे पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक विद्युत प्रवाहाचा तीव्र शॉक लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. आसपासच्या नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली; मात्र दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
ही घटना शुक्रवार दि. २९ मे रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान, या हृदयद्रावक घटनेमुळे कपीलापुरी गावावर शोककळा पसरली असून दोन्ही तरुणांच्या अकाली निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील नागरिकांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!