प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गौरी घोरपडेची महाराष्ट्र पोलिसांत निवड; नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्याकडून सत्कार.
![]() |
| Overcoming Adversity, Gauri Ghorpade Selected for Maharashtra Police; Felicitated by Town Council President Zakir Saudagar. |
परंडा, दि. ३० (रंगोली न्यूज) – Overcoming Adversity, Gauri Ghorpade Selected for Maharashtra Police; Felicitated by Town Council President Zakir Saudagar. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत परंडा येथील भटक्या समाजातील वैदु समाजाची कन्या कु. गौरी सुभाष घोरपडे हिची महाराष्ट्र पोलीस दलात नवी मुंबई येथे निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परंडा नगर परिषदेचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते शनिवारी (दि. ३०) तिचा सत्कार करण्यात आला.
गौरीच्या यशामागे तिच्या आईचे मोठे योगदान आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिच्या आईने डोक्यावर टोपली घेऊन प्लास्टिक साहित्य विक्रीचा व्यवसाय करत मुलीचे शिक्षण पूर्ण केले. आईची स्वप्ने साकार करण्यासाठी गौरीनेही अथक परिश्रम घेतले आणि पोलीस भरतीची तयारी करून अखेर महाराष्ट्र पोलीस दलात निवड मिळवली.
![]() |
| Overcoming Adversity, Gauri Ghorpade Selected for Maharashtra Police; Felicitated by Town Council President Zakir Saudagar. |
गौरीच्या या यशामुळे भटक्या समाजासह संपूर्ण परंडा शहराचा गौरव वाढला असून तिच्या कर्तृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी गौरीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तिचे यश इतर युवक-युवतींसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक सत्तार पठाण, वाजीद दखनी, रत्नकांत शिंदे, बब्बू जिनेरी, तन्वीर मुजावर, मुसा हन्नुरे, जावेद पठाण, इरफान शेख, संजय घाडगे, ॲड. संतोष शेळके, सनी राशनकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता रणभोर, दिलीप रणभोर, लक्ष्मीकांत बनसोडे, नाजीम मुजावर, महमूद पठाण, मदन दीक्षित, आसीफ शेख, नवाज शेख, तय्यब पठाण, कय्यूम तूटके, फैजू चौधरी, अमित जोशी, रवि भिस्ती, शाम घोरपडे, वसंत घोरपडे, गोविंद शिंदे, विलास शिंदे, वामन शिंदे, बाबा शिंदे, अनिल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गौरी घोरपडेच्या यशाने परंडा तालुक्यातील युवक-युवतींना नवी प्रेरणा मिळाली असून तिच्या कर्तृत्वाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!