ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

राजा शिवछत्रपती परिवाराकडून परंडा भुईकोट किल्ल्यावर सुमारे ६०० मावळ्यांची स्वच्छता मोहीम; गडसंवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम. A cleanup drive involving approximately 600 'Mavales' was conducted at the Paranda Land Fort by the Raja Shivchhatrapati Parivar.

राजा शिवछत्रपती परिवाराकडून परंडा भुईकोट किल्ल्यावर  सुमारे ६०० मावळ्यांची स्वच्छता मोहीम; गडसंवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

A cleanup drive involving approximately 600 'Mavales' was conducted at the Paranda Land Fort by the Raja Shivchhatrapati Parivar.
A cleanup drive involving approximately 600 'Mavales' was conducted at the Paranda Land Fort by the Raja Shivchhatrapati Parivar.

परंडा, दि. ३१ (रंगोली न्यूज) – A cleanup drive involving approximately 600 'Mavales' was conducted at the Paranda Land Fort by the Raja Shivchhatrapati Parivar. राजा शिवछत्रपती परिवार आयोजित गड-किल्ले स्वच्छता मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. ३१ मे) परंडा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर मुख्य मोहीम "Main campaign at the historic Bhuikot Fort in Paranda" क्र. २१ राबविण्यात आली. या मोहिमेत महाराष्ट्रातील तब्बल २६ जिल्ह्यांमधून आलेल्या सुमारे ६०० ते ७०० युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गडसंवर्धनाचा संदेश दिला.

या मोहिमेसाठी सहभागी मावळ्यांचे १५ स्वतंत्र गट करण्यात आले होते. प्रत्येक गटाला किल्ल्यातील विशिष्ट परिसर स्वच्छतेसाठी नेमून देण्यात आला होता. सकाळपासूनच सर्व गटांनी किल्ल्याच्या वास्तूला हानी पोहोचवणारी अनावश्यक झाडे-झुडपे हटविणे, परिसरातील कचरा गोळा करणे, स्वच्छता करणे आणि ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले. या उपक्रमामुळे भुईकोट किल्ल्याचा परिसर अधिक स्वच्छ व सुस्थितीत दिसून आला.

मुख्य स्वच्छता मोहिमेसाठी आलेले मावळे दि. ३० मे रोजी सायंकाळी परंडा येथे दाखल झाले होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था परंडा येथील राजवीरा मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा धीरजसिंह ठाकूर यांनी आपल्या राजवीरा मंगल कार्यालयात केली होती. या सहकार्याबद्दल परंडा तालुका मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

राजा शिवछत्रपती परिवाराकडून दरवर्षी दोन मुख्य मोहिमा आयोजित केल्या जातात. सन २०२६ मधील प्रमुख मोहिमांपैकी परंडा येथील ही मोहीम विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या मोहिमेद्वारे केवळ स्वच्छता नव्हे तर ऐतिहासिक वारशाचे जतन, संवर्धन आणि जनजागृती करण्याचे कार्य करण्यात आले.

राजा शिवछत्रपती परिवार ही महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेली एक अग्रगण्य संस्था आहे. संस्थेमार्फत राज्यभर विविध प्रकारच्या मोहिमा राबविल्या जातात. "मुख्य मोहीम" या दोन दिवसांच्या उपक्रमात पहिल्या दिवशी देवदर्शन तर दुसऱ्या दिवशी गड-किल्ल्यांवरील स्वच्छता केली जाते. "संयुक्त मोहीम" अंतर्गत दोन किंवा अधिक विभाग एकत्र येऊन स्वच्छता आणि संवर्धनाचे कार्य करतात. तर "विभागीय मोहीम" ही एकदिवसीय असून त्यामध्ये स्वच्छता, वृक्षारोपण तसेच मदत उपक्रम राबविले जातात.

गड-किल्ले संवर्धनासोबतच व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, रोजगार मार्गदर्शन, गरजूंना मदत, महिला सक्षमीकरण आणि ऐतिहासिक वारशाबाबत जनजागृती करणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. सामाजिक बांधिलकी आणि इतिहासाबद्दलची जागरूकता जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य राजा शिवछत्रपती परिवार सातत्याने करीत असल्याचे या मोहिमेतून पुन्हा अधोरेखित झाले.

या भव्य उपक्रमामुळे परंडा भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाला नवी ऊर्जा मिळाली असून राज्यभरातून आलेल्या मावळ्यांच्या सहभागामुळे ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची प्रेरणादायी नांदी मिळाली आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!



Post a Comment

0 Comments