परंडा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी
![]() |
| The 301st birth anniversary of Punyashlok Ahilyadevi Holkar was celebrated with great enthusiasm in the city of Paranda. |
परंडा, दि. ३१ (रंगोली न्यूज) – The 301st birth anniversary of Punyashlok Ahilyadevi Holkar was celebrated with great enthusiasm in the city of Paranda. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान आणि सकल धनगर समाज यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, परंडा नगरपरिषदेचे अध्यक्ष जाकीरभाई सौदागर, उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, नूतन जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब खरसडे, रेवण ढोरे, धनंजय सावंत, युवा नेते सोहम सावंत, जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे, शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मारुती मासाळ, ह.भ.प. बालाजी बोराडे, ॲड. सुजित देवकाते, सतीश खोत, प्रा. गौतम लटके, विकास कुलकर्णी, अश्रू लेंगरे, दादा पाडुळे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष आप्पा तरटे, उत्रेश्वर बापू ठवरे, बाप्पा काळे, महावीर नरुटे, आप्पा मुसळे, अमोल तरटे, नितीन नरुटे, उमेश चोरमले, गणेश मुसळे, शहाजी सोलणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष समाधान कोळेकर, उपाध्यक्ष मनोज नरुटे, सचिव तुषार कोळेकर, तसेच वैभव मासाळ, अथर्व मदने, अनिकेत मदने, धनाजी गडदे, शशिकांत चोरमले आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. जयंती कार्यक्रमामुळे परंडा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!