ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जनतेच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आक्रमक; तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन. परंडा तालुक्यातील विविध जनसमस्यांबाबत प्रशासनाला निवेदन; बससेवा, लाडकी बहीण योजना आणि मूलभूत सुविधांवर तातडीच्या उपाययोजनांची मागणी. NCP (Sharad Pawar Faction) Takes Aggressive Stance on Public Issues; Submits Memorandum of Various Demands to the Tehsildar.

जनतेच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आक्रमक; तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन.

परंडा तालुक्यातील विविध जनसमस्यांबाबत प्रशासनाला निवेदन; बससेवा, लाडकी बहीण योजना आणि मूलभूत सुविधांवर तातडीच्या उपाययोजनांची मागणी.

NCP (Sharad Pawar Faction) Takes Aggressive Stance on Public Issues; Submits Memorandum of Various Demands to the Tehsildar.
NCP (Sharad Pawar Faction) Takes Aggressive Stance on Public Issues; Submits Memorandum of Various Demands to the Tehsildar.

परंडा दि. ३ (रंगोली न्यूज) – NCP (Sharad Pawar Faction) Takes Aggressive Stance on Public Issues; Submits Memorandum of Various Demands to the Tehsildar. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या तालुकानिहाय जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परंडा तहसील कार्यालयात विविध जनहिताच्या प्रश्नांबाबत तहसीलदार यांना दि. ३ मे रोजी निवेदन सादर करण्यात आले. वाढती महागाई, बेरोजगारी, डिझेल दरवाढ, एसआयआर (SIR) प्रक्रिया व मतदार यादीतील त्रुटींसह तालुक्यातील नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष किरण करळे, जिल्हा सचिव सुवास ठोंगे, शहराध्यक्ष शहाबर्फीवाले, युवक तालुका अध्यक्ष प्रवीण गरड, शिवाजी गायकवाड, जिल्हा संघटक अमोल सुरवसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, परंडा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना सध्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल व डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार व सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले "Citizens' financial calculations have gone awry." आहे. तसेच एलपीजी गॅस, किराणा माल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण अधिक वाढला आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून खराब रस्ते, अपूर्ण दुरुस्ती आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खत, बियाणे, सिंचन सुविधा आणि कृषी सेवा वेळेत उपलब्ध होत नसल्याने शेती व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. वाढत्या बेरोजगारीमुळे युवकांमध्ये असंतोष निर्माण होत असून रोजगारनिर्मितीसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा दूर करावा, शासकीय कार्यालयांमधील कामकाजातील विलंब कमी करावा तसेच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व कमी दाबाची समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करून ग्रामीण भागातील बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परंडा आगारातील चालक व वाहकांच्या रिक्त पदांचा प्रश्नही निवेदनाद्वारे मांडण्यात आला. परंडा आगारातून दररोज ६१ बस फेऱ्या चालवल्या जात असून त्या सुरळीतपणे चालविण्यासाठी सुमारे ८० चालक व वाहकांची आवश्यकता आहे. मात्र सध्या केवळ ६५ कर्मचारी कार्यरत असल्याने सुमारे १५ चालक आणि १५ वाहकांची कमतरता भासत आहे. या मनुष्यबळाच्या अभावामुळे अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागतात किंवा बससेवा उशिराने चालते. परिणामी विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे रिक्त पदे तात्काळ भरून बससेवा नियमित व सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची नावे वगळली जात असल्याबाबतही गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला. केवायसी (KYC) प्रक्रियेतील अडचणींमुळे अनेक पात्र महिलांचा लाभ बंद झाला असून त्यांच्या खात्यात अनुदान जमा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कोणतीही पूर्वसूचना अथवा योग्य मार्गदर्शन न देता लाभ बंद करणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची नावे वगळण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, केवायसीमुळे बंद झालेल्या प्रकरणांचा विशेष मोहीम राबवून निपटारा करावा, तालुका व ग्रामस्तरावर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत तसेच लाभार्थी महिलांची अद्ययावत माहिती सार्वजनिक करून पारदर्शकता राखावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

याशिवाय एसआयआर प्रक्रिया, मतदार यादीतील त्रुटी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित सर्व प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाला जागे करण्यासाठी हे निवेदन देण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले असून संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!



Post a Comment

0 Comments