ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी; नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना. Inspection of 'Aaple Sarkar Seva Kendras' in Paranda Taluka; instructions issued to provide quality services to citizens.

परंडा तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी; नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना

Inspection of 'Aaple Sarkar Seva Kendras' in Paranda Taluka; instructions issued to provide quality services to citizens.
Inspection of 'Aaple Sarkar Seva Kendras' in Paranda Taluka; instructions issued to provide quality services to citizens.

परंडा दि. ४ (रंगोली न्यूज) – Inspection of 'Aaple Sarkar Seva Kendras' in Paranda Taluka; instructions issued to provide quality services to citizens. परंडा तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. तहसीलदार निलेश काकडे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार पूजा गोरे यांनी गुरुवारी (दि. ४) प्रत्यक्ष भेटी देऊन विविध बाबींची पाहणी केली.

तपासणीदरम्यान सेवा केंद्रांमध्ये नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची सखोल तपासणी करण्यात आली. यामध्ये केंद्रावर शासनमान्य दरपत्रक प्रदर्शित केले आहे का, क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध आहे का, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याची पाहणी करण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार पूजा गोरे यांनी केंद्र चालकांना नागरिकांना वेळेत, पारदर्शक व दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना दिल्या. तसेच केंद्रांवरील आढळून आलेल्या त्रुटींची तात्काळ पूर्तता करावी, सर्व नोंदी अद्ययावत ठेवाव्यात आणि शासनाने निश्चित केलेल्या शुल्कानुसारच सेवा शुल्क आकारावे, असे निर्देश देण्यात आले.

याशिवाय विविध शासकीय सेवा नागरिकांना सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुविधा केंद्रांमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच आपले सरकार सेवा केंद्रांचे कामकाज चालविणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित केंद्र चालकांवर शासकीय नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या तपासणी मोहिमेत नायब तहसीलदार पूजा गोरे यांच्यासोबत मंडळाधिकारी पवार, ग्राम महसूल अधिकारी विष्णू जाधव, महसूल सहाय्यक अमोल हंकारे, ऑपरेटर अण्णा मगर, नागेश मसगुडे तसेच ग्राम महसूल सेवक यांनी सहभाग घेतला.

परंडा तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या व पारदर्शक शासकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महसूल प्रशासनाकडून ही तपासणी मोहीम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!



Post a Comment

0 Comments