स्व. गोपीनाथ मुंडे यांना परंड्यात अभिवादन
![]() |
| Tributes Paid to the Late Gopinath Munde in Paranda |
परंडा दि. ३ (रंगोली न्यूज) – Tributes Paid to the Late Gopinath Munde in Paranda जनसामान्यांचे आधारस्तंभ, माजी केंद्रीय मंत्री व लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी स्व. मुंडे यांनी राज्य व देशाच्या राजकारणात दिलेल्या योगदानाचा तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबाप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, परंडा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, तालुका उपाध्यक्ष डॉ. अमोल गोफणे, हरी शिंदे, जयदेव गोफणे, विकास कुलकर्णी, धनाजी गायकवाड, अमोल केमदारणे, ॲड. जहीर चौधरी, साहेबराव पाडुळे, निशिकांत क्षीरसागर, बाळासाहेब गिरी, नागेश गर्जे, नागेश शिंदे, तानाजी घोडके, प्रा. विलास गायकवाड, शिवाजीराव पाटील, श्रीकृष्ण शिंदे, तुषार नेटके, रामदास गुडे, सुजित परदेशी, जयंत सायकर, योगेश डांगे, अभिषेक चोबे, रामेश्वर चोबे, रवीकुमार गरड, शहर सरचिटणीस धनंजय काळे, तुषार कोळेकर, समाधान कोळेकर, सुखदेव इंगळे, संपत्ती भोळे, गणेश होरे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!