कुंभेजा येथे सशस्त्र दरोडा टाकणारी कुख्यात टोळी २४ तासात जेरबंद.
परंडा पोलीस व धाराशिव गुन्हेशाखेची कौतुकास्पद कामगिरी.
![]() |
| Notorious Gang Behind Armed Robbery at Kumbheja Apprehended Within 24 Hours. |
रंगोली न्युज - परंडा दि. २६)
Notorious Gang Behind Armed Robbery at Kumbheja Apprehended Within 24 Hours. धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील कुंभेजा येथील कॅनॉल शेजारी असलेल्या माजी सैनिक विश्वनाथ जगताप यांच्या वस्तीवर दि. २५ फेब्रुवारी रोजी सशस्त्र दरोडा टाकनारी ७ जनांची टोळी धाराशिव गुन्हे शाखा व परंडा पोलीस ठाणे यांनी २४ ताराच्या आत जेरबंद केली आहे.
[ 👉] घटना -
परंडा पोलीस ठाणे व धाराशिव गुन्हे शाखेने कौतुकास्पद ७ दरोडेखोरांना २४ तासांच्या आत जेरबंद केले असुन त्याचे कुंभेजा गावाकऱ्यांसह तालुक्यातुन कौतुक होत आहे. याबाबत मिळालेली माहीती अशी की, दि. २५ रोजी रात्री १२.३० वा चे सुमारास पोलीस ठाणे परंडा हद्दीतील मौजे कुंभेज येथे रात्री कॅनॉलचे बाजूला असलेल्या माझी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप रहात असलेल्या शेतवस्तीवर त्यांचे राहते घरासमोर बाजावर विश्वनाथ जगताप व त्यांची पत्नी झोपलेले असताना काही अज्ञात दरोडे खोरांनी विश्वनाथ जगताप यांचेवर चाकूने प्राणघातक हल्ला करूनण त्याना गंभिर जखमी करूण त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागीने जबरदस्तीने काढूण दरोडा टाकूण पळून गेल्याची घटना घडली होती.
[ 👉] परंडा पोलीस व धाराशिव गुन्हेशाखेची कामगिरी.
त्याअनुषगाने पोलीस निरीक्षक विनोद इज्जापवार यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. सचिन खटके, सपोनि अमोल मोरे व त्यांचे स्थानिक गुन्हा शाखेच्या पत्यकासह घटना घडलेल्या ठिकाणी जावुन भेट देवून घटनास्थळाची पाहणी करून घटनेच्या वेळी हजर असणारे महिलेकडून घटनेची माहिती घेतली, पंरतू घटना ही रात्रीच्या अंधारात घडली होती. तसेच जखमी माजी सैनिक जगताप यांच्या पत्नी घाबरलेल्या असल्याने त्यांना देखील अज्ञात आरोपींचे वर्णन सांगता येत नव्हते, सदर विकाणी कोठेहि सी.सी.टि. व्हि. नसल्याने यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे व गुन्हा उघडकिस आणणे आव्हानात्मक होते. त्यामुळे सदर गुन्हयाचे तपासात पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत अमना मॅडम उपविभागिय पोलीस अधिकारी उप विभाग भुम अनीला चोरमले यांचे मार्गदर्शक सूचना तसेच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. सचिन खटके स.पो.नि. अमोल मोरे यांचे पथकासह वेगवेगळया ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना, पथकास गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरूण व गुन्हेगारांचे गुन्हा करण्याचे पध्दती वरून, सदर घटना ही अनाळा येथील किरण पंडीत शिंदे, चेतन किरण शिंदे, डोकेवाडी येथील विकास नागेश भोसले, हिवडा ज्ञानेश्वर लिम्या काळे व त्याचे इतर साथीदार यांनी केलेली असून सध्या ते सर्वजण डोकेवाडी शिवारात शेतात थांबलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने लागलीय पो.नि. विनोद इज्जपवार यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. खटके, स.पो.नि. मोरे यांचे पथकासह सुयोग्य नियोजन करून आरोपी थांबलेल्या ठिकाणी सर्व बाजुने त्यांना घेरून पकडत असताना त्यातील काही जण शेतात पळून जात असतांना त्या सर्वांना पाठलाग करून शिताफीने पकडून ताब्यात घेवून सर्वांना त्यांचे नाव, गाव बाबत विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) किरण पंडीत शिंदे, वय २६ वर्षे रा. अनाळा २) राघवा निवांत्या शिंदे, वय २५ वर्षे रा.अनाळा ३) ज्ञानेश्वर लिग्या काळे, वय २३ वर्ष रा. हिवर्डा ४) विकास नागेश भोसले वय २९ वर्षे ग. डोकेवाडी ५) सुनिल प्रकाश भोसले, वय २२ वर्ष रा. अंजनसोंडा ६) चेतन किरण शिंदे वय १९ वर्षे रा. अनाळा ७) सुनिल चरण शिंदे, वय २२ वर्षे रा.अनाळा असे सांगीतले.
[ 👉] चौकशी -
त्यांना रात्री पोस्टे परंडा हद्दीत घडलेल्या घटनेबाबत विचारले असता, त्यांनी सुरवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून विचारले असता त्यांनी सांगीतले की, रात्री आम्ही दोन मोटार सायकल वर कुंभेज येथे जावुन मोटार सायकल कॅनॉलचे बाजुला लावून जवळ असलेल्या शेतवस्तीवर तेथून पायी चालत गेलो. तेथे एका घरासमोर बाजावर दोघेजण झोपलेले दिसले. आम्ही पायाचा आवाज न येवु देता महिलेचे गळ्यातील सोन्याचे दागीने हिसकावण्याचा प्रयत्न करत असताना, बाजुला झोपलेल्या माणसाने उठुन आमचेपैकी एकास पकडले. तो सोडत नसल्याने त्याचे तोंड दाबून त्याचेवर चाकूने वार केले. तेव्हा बाजुला झोपलेली बाई उठुन पळून जात असताना तिचे गळ्यातील सोन्याचे दागीने हिसकावून घेतले. ती बाई थोड्याच अंतरावर जावुन मोठमोठ्याने आरडाओरड करत असल्याने आम्ही तेवून पळून गेलो, असे सांगून सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केल्या त्यांची झडती घेतली असता ज्ञानेश्वर लिग्या काळे याचे पँटचे खिशात महिलेच्या गळ्यातील तुटलेले सोन्याचे गंठनची तीस हजार रूपये ची एक सोन्याची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चौन गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल किंम्मत १ लाख २५ हजार रुपये असे एकूण १ लाख ९५ हजार रुपयाचा मुद्येमाल हस्तगत करूण २४ तासाचे आत सदर दरोडयाचा गुन्हा उघडकिस आणला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागिय पोलीस अधिकारी उप विभाग भुम अनील चोरमले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पो.नि. आसाराम चोरमले, स.पो.नि. सचिन खटके, स.पो.नि. अमोल मोरे, स.पो.नि. सुर्वे, सहाय्यक पो.नि. सिरसट, सहाय्यक पो.नि. शंकर सुर्वे, पो.उ.नि. खरात, पोलीस पोलीस हवालदार, विनोद जानराव, नितीन जाधवर, बळीराम शंदे, अमोल चव्हाण, शौकत पठाण, दयानंद गादेकर, राठोड, स.पो.फौ गजानन मुळे, पवार, पोलीस नाईक बबन जाधवर, चा.पो.ह. महेबुब अरब, रोहीत दंडनाईक, विनायक दहिहंडे, पो.ह. शिंदे, शेख, शेवाळे, सरगर आर.सी.पी. पथक यांचे पथकाने केली असून त्याचे कुंभेजा ग्रामस्थांसह परंडा तालुक्यातुन कौतुक होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!