ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह व ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे वक्तव्य करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी. परंडा तालुका मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ची निवेदनाद्वारे मागणी. Demand for strict action against those making offensive and historically inaccurate statements regarding Chhatrapati Shivaji Maharaj.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह व ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे वक्तव्य करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी.

परंडा तालुका मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ची निवेदनाद्वारे मागणी.


Demand for strict action against those making offensive and historically inaccurate statements regarding Chhatrapati Shivaji Maharaj. Demand for strict action against those making offensive and historically inaccurate statements regarding Chhatrapati Shivaji Maharaj.

Demand for strict action against those making offensive and historically inaccurate statements regarding Chhatrapati Shivaji Maharaj.

रंगोली न्युज - परंडा दि. २८)          

Demand for strict action against those making offensive and historically inaccurate statements regarding Chhatrapati Shivaji Maharaj. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह व दिशाभूल करणाऱ्या वक्तव्याविरुद्ध कारवाई करणेबाबत परंडा तालुका मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने परंडा तहसीलदार यांना दि. २७ रोजी निवेदन देण्यात आले. 

    निवेदनात असे म्हटले आहे की, धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम) यांनी सार्वजनिक व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह व ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यांनी असे विधान केले आहे की—“छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकल्यानंतर त्यांनी समर्थ रामदास स्वामींना हा राजपाट सांभाळा असे सांगितले.” हे वक्तव्य पूर्णपणे बिनबुडाचे असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याचा अवमान करणारे आहे. तसेच समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा विपर्यास करून समाजात गैरसमज व तणाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी हे समकालीन असले तरी रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असा कोणताही सबळ ऐतिहासिक  पुरावा आज उपलब्ध नाही. वरील विधानांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची असमर्थता तर रामदास स्वामींची समर्थतता दाखवण्याचा चुकीचा आणि खोडसाळपणाचा प्रयत्न दिसतो. अशा प्रकारचे विधान समाजात तेढ निर्माण करणारे असून सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीचे कृत्य हे कायदेशीररित्या चुकीचे आहे. याची योग्य ती चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड शाखा परंडा यांच्या वतीने विनंती करण्यात आली. संबंधित व्यक्तीविरुद्ध  तात्काळ गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारची बेजबाबदार व समाजविघातक विधाने होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्याल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

     निवेदनावर देवानंद टकले, रवि मोरे, गोरख मोरजकर, नानासाहेब शिंदे, नाना मांडवे, मनोज कोळगे, निशिकांत क्षिरसागर, महेश शिंदे, सुहास ठोंगे, समाधान खुळे, धर्मराज गटकुळ आदींच्या सह्या आहेत.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments