पत्रकाराला आरेरावी व शिवीगाळ; नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी.
परंडा तालुक्यात पत्रकारांच्या वतीने निषेध.
![]() |
| Journalist subjected to high-handedness and verbal abuse; demand for suspension of Municipal Council employee. |
Journalist subjected to high-handedness and verbal abuse; demand for suspension of Municipal Council employee. शहरातील पत्रकाराला फोनवर अरेरावी करत शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नगरपरिषद कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्यावर कठोर कारवाई करून तात्काळ निलंबन करावे, अशी जोरदार मागणी परंडा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे.
मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, मंगळवार पेठेतील मुजावर गल्ली परिसरात मागील दोन-तीन दिवसांपासून कचरा उचलण्यासाठी घंटागाडी आली नव्हती. याबाबत पत्रकार निसार मुजावर यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून विचारणा केली असता, सोंडगे यांनी अरेरावी करत शिवीगाळ केली. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी अशा प्रकारे गैरवर्तन करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे असताना आरेरावी व शिवीगाळ करण्यात आली. या घटनेचा परंडा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, संबंधित कर्मचारी जगदीश सोंडगे यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करून निलंबीत करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर पत्रकार आनंद खर्डेकर, सुरेश घाडगे, प्रमोद वेदपाठक, अविनाश इटकर, विजय माने, मुजीब काजी, आशुतोष बनसोडे, प्रशांत मिश्रा, भजनदास गुडे, तुकाराम गंगावणे, आप्पासाहेब शिंदे, गणेश राशिनकर, सुहास मस्के, सचिन कुलकर्णी, विनय कुलकर्णी, शहाजी कोकाटे, निसार मुजावर, विजय मेहेर, गोरख देशमाने, सदाशिव डाके, फारुक शेख, तानाजी घोडके, सुरेश बागडे, राहुल अर्जुन बनसोडे, रावसाहेब गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!