भैरवनाथ शुगर सोनारीचा रोलर पुजन सभारंभ संपन्न.
![]() |
| Bhairavanath Sugar Goldsmith's Roller Pujan Session concluded. |
रंगोली न्युज - परंडा दि. २८)
Bhairavanath Sugar Goldsmith's Roller Pujan Session concluded. धाराशिव जिल्ह्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट नं.१ या साखर कारखान्याचे गाळप हंगाम २०२६-२७ साठी रोलर पुजन राजेश शेळके व कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे यांचे शुभहस्ते दि. २८ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले.
परंडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली तसेच कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विकम सावंत यांचे नियोजनाने गाळप हंगाम २०२६-२७ साठी कारखाना गाळपासाठी लवकरच सज्ज करण्यात येणार आहे.
गाळप हंगाम सन २०२६-२७ चा सुरळीत चालू करण्याचे दृष्टीने कारखान्याची मशिनरी रिपेअरींग, ओव्हरऑयलींगची कामे "Factory machinery repair and overhauling works." चालू असून कारखाना कार्यक्षेत्रामध्ये गतवर्षी पाऊस समानधारक झाल्याने ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झालेली असून गाळपासाठी ऊस मुबलक उपलब्ध असल्याचे कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.
रोलर पुजन समारंभ प्रसंगी डिस्टीलरी मॅनेजर अजित भोसले, चिफ केमिस्ट दादासाहेब बोरकर, शेती अधिकारी बापुसाहेब देशमुख, चिफ अकौंटंट गोविंद कुलकर्णी, इलेक्ट्रीकल मॅनेजर उदयसिंह गडगे तसेच दादा काळे, बाळासाहेब लांडगे, जीवन दाढे, आबा अनवणे, भैरु गरदाडे, बालाजी लोंढे, बाळासाहेब धुमाळ, सोमनाथ सुर्यवंशी, लक्ष्मण ढगे, संदिप कवठे, हरिदास ढगे. सुरेश साळुंके, जेजेराम सुर्यवंशी व ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यकमाचे सूत्रसंचालन सुभाष भोसले यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!