निवृत्तीनिमित्त महानंदा कांबळे यांचा सेवा गौरव.
![]() |
| Mahananda Kamble Honored for Her Service Upon Retirement |
रंगोली न्युज - परंडा दि. २९)
Mahananda Kamble Honored for Her Service Upon Retirement तालुक्यातील कुंभेजा येथील अंगणवाडी मदतनीस महानंदा धोंडीराम कांबळे या 30 एप्रिल २०२६ रोजी ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. यानिमित्त मंगळवारी दि. २८ रोजी सोनारी विभागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावतीने त्यांचा सहकुटुंब सत्कार करून निरोप देण्यात आला.
सोनारी विभागाच्या अधीक्षिका करूणा गायकवाड यांनी महानंदा कांबळे यांचा साडी-चोळी, शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून सत्कार केला. यावेळी सोनारी विभागातील ३० अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावतीने कांबळे यांना भेट वस्तू देण्यात आली.
यावेळी अधीक्षिका करूणा गायकवाड यांच्यासह कुंभेजा येथील सेविका सिंधुबाई सुनील कांबळे, सेविका मीनाक्षी काळे, श्वेता हजारे, रेखा सरडे, प्रतीक्षा सूर्यवंशी, उषा चौधरी, सुमन सोनवणे यांच्यासह सोनारी विभागातील ३० अंगणवाडी सेविका, मदतनीस, महानंदा कांबळे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!