परंडा शहरात राष्ट्रीय "स्व-गणना" उपक्रमाला सुरवात.
नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्याकडून महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा.
![]() |
| National "Self-Census" Initiative Launched in Paranda City. |
रंगोली न्युज - परंडा दि. १)
National "Self-Census" Initiative Launched in Paranda City. दि. १ मे २०२६ पासून भारताची बहुप्रतिक्षीत जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्याला सुरवात झाली असून धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगर परिषदच्या वतीने दि. १ मे रोजी परंडा नगर परिषद येथे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधीकारी मणीषा वडेपल्ली यांनी "स्व-गणना" या विषयी मार्गदर्शन करून या उपक्रमाचा शुभारंभ केला.
१ मे पासून राज्यात "स्व-गणना" "Self-Calculation" ला सुरवात झाली असून नागरीकांनी http://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली माहीती भरावी. यामध्ये नागरीकांनी स्वत:चा मोबईल क्र. वापरून OTP द्वारे लागीन करावे. तुमचे राज्य, जिल्हा व स्थानीक तपशिल निवडावा. नंतर डिजीटल नकाशावर तुमच्या घराचे स्थान चिन्हांकीत करावे. घर व कुटूंबाशी संबंधित माहीती भरावी. अर्ज सादर केल्यानंतर तुंम्हाला SE ID मिळेल. तो SE ID सुरक्षीत ठेवावा. प्रगणक आल्यानंतर त्यांना SE ID द्यावा. व यावरून प्रगणक माहितीची पडताळणी करतील. सदर तुमची माहीती ही पूर्णपणे गोपनिय आणि सुरक्षित राहणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगीतले असून या स्व-गणना सर्व नागरिकांनी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.
याचे फायदे -
या स्वगनणेमुळे आपल्या वेळेची बचत होईल. माहीती अचूक सादर होईल. व जलद माहिती प्रक्रीया पूर्ण होईल.
![]() |
| National "Self-Census" Initiative Launched in Paranda City. |
नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा.
परंडा नगर परिषद चे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनानिमीत्त राष्ट्रध्वजारोहन करून, राष्ट्रीय महापूरूषांना पुष्पहार अर्पण केले. व महाराष्ट्र दिन व कामगारदिनाच्या नागरीकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याधिकारी मणीषा वडेपल्ली, नगरसेवक वाजी दखणी, नगरसेवक सत्तार पठाण, शरीफ तांबोळी, तनवीर मुजावर, दयानंद बनसोडे, राजाभाऊ कडबणे, मुनीर जिकरे, रणजीत काशीद, गजानन पाटील, बाबा दणाने, किरण शिंदे, संतोष दीक्षित, आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!