ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बावची विद्यालय परांडा गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न. Meritorious Students' Felicitation Ceremony Held at Bavchi Vidyalaya, Paranda.

बावची विद्यालय परांडा गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न.

Meritorious Students' Felicitation Ceremony Held at Bavchi Vidyalaya, Paranda.
Meritorious Students' Felicitation Ceremony Held at Bavchi Vidyalaya, Paranda.

रंगोली न्युज - परंडा दि. २) 

Meritorious Students' Felicitation Ceremony Held at Bavchi Vidyalaya, Paranda. महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने दि. १ मे २०२६ रोजी बावची विद्यालय, परंडा येथे प्रथम शाळेचे मु.अ. नारायण खैरे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहन करून गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न झाला.

     महाराष्ट्र दिनानिमीत्त बावची विद्यालय परंडा येथे गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा, अक्षरगंगा स्पर्धा परीक्षा तसेच NMMS परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येक वर्गातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

      सन्मानित विद्यार्थ्यांमध्ये सदिच्छा प्रदिप काळे, युवराज संतोष बुलबुले, समर्थ दिपक दोरगे, प्रज्वल रामदास होरे, स्वरा नानासाहेब रेडे, तन्मय बालाजी शिंदे, प्राप्ती संभाजी सातपुते, मेघराज मनोज खरपुडे- पाटील, सोहम धनराज बनसुडे, रणवीर रविंद्र कापसे, आरोह नितीन भांडवलकर, हुजेफ शहानबाज सय्यद, शिवांश प्रशांत पाटील, अथर्व अमितकुमार लटके, अभिराज किशोर नरसिंगे, कृतिका हंसराज घाडगे, आराध्या राजकुमार चव्हाण, राजवीर रमेश शिंदे, स्वरा पवन सूर्यवंशी, स्वरांजली शहाजी मिसाळ, प्रणव नारायण खैरे, श्रीमुग्धा अदिकराव शेळवणे, शौर्य दीपक दोरगे, प्रांजल चंद्रकांत वटारे, हिंदवी रोहित शेळके, संस्कृती समाधान देवकर, राजनंदिनी रमेश शिंदे, जाह्नवी सतीश सोनमाळी व स्नेहश्री अप्पाराव बंडगर यांचा समावेश होता.

      या प्रसंगी राजे शिवाजी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा बनसोडे मॅडम, विद्यालयातील शिक्षकवृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे नियोजन व संचालन विकास वाघमारे व अनभुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कष्ट घेतले.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments