ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ग्लोबल ज्युनिअर कॉलेजचा १२ वी चा निकाल १०० टक्के निकालाची परंपरा कायम. १२ वी च्या परीक्षेमध्ये परंडा तालुक्यात सोनाली गटकुळ प्रथम तर राजलक्ष्मी पाटील दुसरी. संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व सचिव आशाताई मोरजकर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन. In the 12th-grade examinations, Sonali Gatkul secured the first rank and Rajlakshmi Patil the second in Paranda Taluka.

ग्लोबल ज्युनिअर कॉलेजचा १२ वी चा निकाल १०० टक्के निकालाची परंपरा कायम.

१२ वी च्या परीक्षेमध्ये परंडा तालुक्यात सोनाली गटकुळ प्रथम तर राजलक्ष्मी पाटील दुसरी.

संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व सचिव आशाताई मोरजकर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन.

In the 12th-grade examinations, Sonali Gatkul secured the first rank and Rajlakshmi Patil the second in Paranda Taluka.
In the 12th-grade examinations, Sonali Gatkul secured the first rank and Rajlakshmi Patil the second in Paranda Taluka.

रंगोली News - परंडा दि. ३) 

In the 12th-grade examinations, Sonali Gatkul secured the first rank and Rajlakshmi Patil the second in Paranda Taluka. धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील ग्लोबल इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज परांडा या महाविद्यालयाचा इयत्ता १२ वी चा निकाल यंदा १०० टक्के लागला असून संस्थेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

    १२ वी परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत शाळेचा लौकिक उंचावला आहे. विशेषतः सोनाली गटकुळ हिने ८३.६७ टक्के गुण मिळवत परंडा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर राजलक्ष्मी पाटील हिने ८०.३३ टक्के गुण मिळवून परंडा तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक तर आरती जाधव हिने ७२ ८३ टक्के गुण मिळवून विद्यालयामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. तसेच किर्ती जाधव ७० टक्के,  निकिता गटकुळ ६९.५० टक्के, अनुराधा सुरवसे ६४ टक्के, अभिजीत मिरगणे ६३.६७ टक्के, दिक्षा कापसे ६३.५० टक्के, स्नेहा जाधव ६०.५० टक्के, विकास सावंत ६० टक्के, राधिका साबळे ६० टक्के, शिवराज कोलते ५९.१७ टक्के, आदर्श जाधव ५८.१७ टक्के, नम्रता निरवणे ५६ टक्के, सागर गायकवाड ५५ टक्के, वैष्णवी सागाडे ५३.६७ टक्के, रोहन खबाले ५२.६७ टक्के, आरती कोलते ५२ टक्के, ओम होरे ५०.१७ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले.

In the 12th-grade examinations, Sonali Gatkul secured the first rank and Rajlakshmi Patil the second in Paranda Taluka.
In the 12th-grade examinations, Sonali Gatkul secured the first rank and Rajlakshmi Patil the second in Paranda Taluka.

      या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व सचिव आशाताई मोरजकर त्याचबरोबर मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. संस्थेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments