ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदलगाव येथे वृक्षारोपण व फळझाड वाटप कार्यक्रम उत्साहात. Tree plantation and fruit sapling distribution program held with enthusiasm at Kandalgaon on the occasion of World Environment Day.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदलगाव येथे वृक्षारोपण व फळझाड वाटप कार्यक्रम उत्साहात.

Tree plantation and fruit sapling distribution program held with enthusiasm at Kandalgaon on the occasion of World Environment Day.
Tree plantation and fruit sapling distribution program held with enthusiasm at Kandalgaon on the occasion of World Environment Day.

परंडा दि. ५ (रंगोली न्यूज) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वयंम शिक्षण प्रयोग (SSP) व एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा तालुक्यातील कांदलगाव येथे वृक्षारोपण व फळझाड वाटप "Tree Plantation and Fruit Tree Distribution" कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महिला शेतकऱ्यांना फळझाडांच्या रोपांचे मोफत वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात कांदलगाव येथील २५ महिला शेतकऱ्यांना आंबा व पेरूच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, वृक्षांचे मानवी जीवनातील योगदान तसेच वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवडीची आवश्यकता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

एलआयसी एचएफएलच्या सहकार्याने स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था परंडा तालुक्यात महिला पुढाकारातून हवामान अनुकूल शेती (WCRF) उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाअंतर्गत महिला शेतकऱ्यांना मिश्र पीक पद्धती, सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता वाढविण्याचे तंत्र, किचन गार्डन निर्मिती, जैविक कीड नियंत्रण, जलसंवर्धन तसेच पर्यावरणपूरक शेती पद्धतींबाबत प्रशिक्षण दिले जात आहे.

कार्यक्रमादरम्यान महिलांना आपल्या शेतात तसेच घराच्या परिसरात अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. वृक्षलागवड ही केवळ पर्यावरण संवर्धनासाठीच नव्हे, तर भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ, निरोगी आणि समृद्ध पर्यावरण देण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या शाहेदा मुजावर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी हवामान बदलामुळे शेतीसमोरील वाढती आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी शाश्वत व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमास प्रकल्पातील महिला शेतकरी, ग्रामस्थ, स्थानिक महिला नेतृत्व तसेच गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पर्यावरण संवर्धनासोबतच शाश्वत शेती, पोषण सुरक्षा आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतींचा प्रसार करण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावागावांत पोहोचण्यास मदत होणार असून, महिला शेतकऱ्यांमध्ये पर्यावरणपूरक आणि हवामान अनुकूल शेतीबाबत जागरूकता निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments